Dhananjay Mahadik Vs Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik Vs Satej Patil: सतेज पाटलांना दंगल घडवायची आहे का? धनंजय महाडिक यांचा रोख....

Kolhapur Lok Sabha Constituency 2024: लोकशाहीमध्ये सर्वच प्रचार करत असतात ते काठीची भाषा वापरतात कदाचित त्यांना दंगल घडवायची असावी. अशा शब्दात महाडिक यांनी पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

Rahul Gadkar

Kolhapur News: महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil)यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ बोलताना, रात्री बारा वाजता काठी घेऊन येऊ, असं विधान केल्यानंतर पाटील यांच्या वक्तव्यावर धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांचा समाचार घेतला आहे.सतेज पाटील यांना कोल्हापुरात दंगल घडवायची आहे का? असा सवाल भाजप खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केला आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

सतेज पाटील विसरलेत की ते आता गृहराज्यमंत्री नाहीत. हे आमचे सरकार आहे. आता त्यांनी सांभाळून बोललं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी जाहीर वक्तव्य करू नये. सतेज पाटील यांना निवडणुकीचा निकाल लक्षात आलेला आहे. निवडणुकीत (Kolhapur Lok Sabha Constituency 2024) पराभव दिसत असल्याने ते वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसत असल्याची टीका धनंजय महाडिक यांनी केली.

त्यांचा उमेदवारी संदर्भातला जो प्लॅन होता तो फेल झाल्याचं त्यांच्या लक्षात आल्याचं दिसत आहे. शाहू महाराजांबद्दल आदर पण महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. कुणी कुणाच्या आडवं जायचं कारण नाही लोकशाही आहे. सतेज पाटील वक्तव्य करत आहे की आमच्या आडवा येऊ नका. कोण कोणाच्या आडवं जात आहे. हे जनतेला माहिती आहे. लोकशाहीमध्ये सर्वच प्रचार करत असतात ते काठीची भाषा वापरतात कदाचित त्यांना दंगल घडवायची असावी. अशा शब्दात महाडिक यांनी पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.

त्यांचा तो नेहमीचा फॉर्मुला आहे आपल्या हातातून यश निश्चित नसेल तर अशा पद्धतीने एखादं स्टंट करायचं आणि लोकांचा अट्रॅक्शन मिळवायचं. गृहमंत्री असताना ते सोडणार नाही उचलून आणतो ही भाषा ते वापरायचे.

कोल्हापूरकरांना माहिती आहे ते घाबरलेले आहेत. या आधी सुद्धा बिंदू चौक मध्ये त्यांनी अंमल महाडिक यांना आव्हान दिलं होतं ते आले नाहीत. कोणीही भाजप कार्यकर्ता त्यांच्या आडवं जाण्याचा प्रश्नच नाही. अशा शब्दात महाडिक यांनी सुनावले आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT