Sadabhau Khot News: ही लढाई वाडा विरुद्ध गावगाडा; सदाभाऊ खोतांनी डागली तोफ

Kolhapur Lok Sabha Constituency 2024: इंडियामध्ये असणारे नेते हे सर्व लुटारू आणि अलिबाबाचे साथीदार आहेत. इंडिया आघाडीच्या लुटारूंना महायुती मूठ माती देईल, असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.
Sadabhau Khot News
Sadabhau Khot NewsSarkarnama

Kolhapur News: 'पश्चिम महाराष्ट्र हा शिव, शाहू आणि फुले यांच्या विचाराने मंतरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य उभे केले, महात्मा फुले आणि शाहू महाराजांनी वंचितांच्या बाजूने लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा समतेचा मार्ग स्वीकारून तळागाळातील माणसासाठी लढत राहिले. पण आता या महान व्यक्तींचं नाव घेणारी माणसं आता कुठे आहेत? असा सवाल रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी करत "आत्ताची लढाई आहे ती वाडा विरुद्ध गावगाडा अशी आहे," असा हल्लाबोल महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर केला.

छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) आणि बाबासाहेब आंबेडकरदेखील वाड्यांच्या विरोधात लढले होते. महायुतीच्या माध्यमातून हे वाडे उद्ध्वस्त होतील, महायुतीचा विजय या ठिकाणी नक्की होणार, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा शाहू महाराज यांचे नाव न घेता हल्लाबोल चढवला आहे. ते कोल्हापुरात (Kolhapur Lok Sabha 2024) बोलत होते.

27 एप्रिलला कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे. पुन्हा एकदा ही जनता पंतप्रधान मोदी यांच्या पाठीमागे उभी राहील. ही लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. इंडियामध्ये असणारे नेते हे सर्व लुटारू आणि अलिबाबाचे साथीदार आहेत. पंतप्रधान मोदी हे भारतातील अठरापगड जातीला सोबत घेऊन जातायेत. त्यामुळे इंडिया आघाडीच्या लुटारूंना महायुती मूठ माती देईल, असा विश्वास माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sadabhau Khot News
Eknath Khadse News: एकनाथ खडसेंची भाजप घरवापसी कधी? विनोद तावडे म्हणाले,...

भारतीय जनता पक्षासोबत आम्ही सर्व घटक पक्ष आहोत. आमचा लढा होता तो सर्व सामान्य माणसाला आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा होता. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुख संपन्नता आणि आनंद असला पाहिजे. आम्हाला काय मिळण्यापेक्षा शेतकऱ्यांना काय देणार ही भूमिका महत्त्वाची आणि आमची आहे. गेल्या 70 वर्षांच्या राजकारणात महाराष्ट्रात मूठभर सरदारांचे राज्य होते. या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवणारे देवेंद्र फडणवीस आहेत, असा टोलाही खोत यांनी लगावला.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com