Dhananjay Mahadik Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhananjay Mahadik and Satej Patil : कोल्हापूरास महापुराच्या संकटातून वाचवण्यासाठी धनंजय महाडिक अन् सतेज पाटील यांच्या हालचाली सुरू!

Kolhapur flood crisis : संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसण्याची भीती आहे.

Rahul Gadkar

Kolhapur flood and Politics : कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला महापुराच्या संकटातून वाचवण्यासाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली. तर त्यांचेच राजकीय विरोधक राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी थेट केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला महापुराच्या विळाख्यातून वाचवण्यासाठी अलमट्टी धरणातील विसर्ग वाढवावा अशी मागणी केली आहे.

एकच नव्हे तर महापूर नियंत्रणासाठी दोन्ही राज्यातील उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे खासदार धनंजय महाडिक यांनी मागणी केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसण्याची भीती आहे. अशावेळी महापुराची तीव्रता कमी करण्यासाठी, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून किमान 3 लाख क्युसेकने पाणी विसर्ग सुरू करणे आवश्यक आहे.

तसेच संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगाने तातडीने एक उच्चस्तरीय समिती नेमावी आणि महाराष्ट्र कर्नाटक मधील जलसंपदा खात्यांच्या अधिकाऱ्यांत समन्वय ठेवावा, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक(Dhananjay Mahadik) यांनी आज केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांच्याकडे केली.

त्याबद्दलचे पत्र खासदार महाडिक यांनी पाटील यांच्याकडे नवी दिल्लीमध्ये सुपूर्द केले. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचे संकट गंभीर बनत चालले आहे. अशावेळी कर्नाटकातील अलमट्टी धरणातून किमान तीन लाख क्यूसेकने पाणी विसर्ग केला, तरच कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाण्याची फुग कमी होते. महापुराचे संकट टाळण्यासाठी आणि जीवित व वित्त हानी रोखण्यासाठी, तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.

त्यासाठी अलमट्टीतून पाणी विसर्ग वाढवणे आणि उच्चस्तरीय समिती नेमून, तत्काळ करावयाच्या उपायोजना आणि दीर्घकालीन उपाय योजना तसेच पूरग्रस्तांचे पुनर्वसन आणि नुकसान भरपाई याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे खासदार महाडिक यांनी निवेदनात नमूद केले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी खासदार महाडिक यांच्या मागणीची गांभीर्याने नोंद घेतली असून, पश्चिम महाराष्ट्रातील महापुराचे संकट रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, असे अभिवचन दिले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT