Pune Rain : पुण्यासह सातारा, कोल्हापुरातील तुफान पावसाचे पडसाद लोकसभेत...

Lok Sabha Session Supriya Sule Pune Satara Kolhapur : खासदार सुप्रिया सुळे यांनी तिन्ही जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करत सरकारला मदतीचे आवाहन केले.
Supriya Sule Pune Rain
Supriya Sule Pune RainSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस कोसळत असल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांतील शाळा, कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे. नद्यांना पूर आल्याने नागरिकांना स्थलांतरित करावे लागत आहे. या गंभीर परिस्थितीचा मुद्दा गुरूवारी लोकसभेतही उपस्थित झाला.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या अधिवेशनात पावसाची माहिती देत मदतीचे आवाहन केले. बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे, सातारा, कोल्हापूर या भागात प्रचंड पाऊस, अतिवृष्टी झाली. काल रात्री प्रशासनाने धरणातून पाणी सोडले. पण सरकारने पाणी सोडण्याआधी नागरिकांना अलर्ट करायला हवे होते, असे सुळे यांनी लोकसभेत सांगितले.

Supriya Sule Pune Rain
Devendra Fadnavis Vs Anil Deshmukh : देशमुखांनी थेट पेनड्राईव्हच बाहेर काढला; फडणवीसांच्या गर्भित इशाऱ्यानंतर दंड थोपटले

ऑरेंज किंवा रेड अलर्ट आहे, हे सरकारला माहिती असताना त्याबाबत पुण्याच्या नागरिकांना का सांगितले नाही, असा सवालही खासदार सुळेंनी उपस्थित केला. पुणे शहर, पिंपरी चिंचवड, वारजे, सिंहगड रोड या भागांतील अनेक शाळा, कॉलेज घरं पाण्याखाली गेली आहेत. लोकं प्रचंड अडचणीत असल्याची व्यथा सुळेंनी मांडली.

पुण्यासह सातारा, कोल्हापूर अडचणीत असून केंद्र सरकारने एनडीआरएफच्या माध्यमातून, पॅकेजच्या माध्यमातून सहकार्य करावे. याची गांभीर्याने नोंद घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकार आणि या भागातील नागरिकांना मदत करावी, असे आवाहन सुळे यांनी केले.

Supriya Sule Pune Rain
Lok Sabha Session : केंद्रीय मंत्र्यांचे थेट लोकसभेतच काँग्रेस खासदाराला चहाचे आमंत्रण; ओम बिर्लांनी सुनावलं...

पुण्यात काय स्थिती?

खडकवासला परिसराबरोबच पुणे परिसरात दोन-तीन दिवस पाऊस पडत असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. अनेक भागांतील इमारतींमध्ये, वाहनतळ परिसरात, वाहनांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक रस्तेही जलमय झाले आहेत. हवामान खात्याने राज्यात पुढील पाच दिवसांचे अंदाज वर्तवले आहेत. त्यानुसार काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर काहींना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com