धनंजय महाडिक यांच्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य करत वासाच्या दुधाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली.
शेतकरी वासाचे दूध परत मागतात पण कायद्यामुळे ते शक्य नाही, यावर मुश्रीफांनी स्पष्ट भूमिका मांडली.
गोकुळ डेअरीतील चेअरमन पदाच्या निवडीवरुन देखील राजकीय वाद पुन्हा पेटला आहे.
Kolhapur News : राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा दरवर्षी दहीहंडी कार्यक्रम होतो. यावेळी देखील होता. मी वेळानं आलो तोपर्यंत त्यांचं भाषण झालं होतं. गोकुळमध्ये महायुतीचा चेअरमन कसा झाला? हे सगळ्यांना माहिती आहे. वासाच्या दुधाचा प्रश्न उपस्थित केला जातोय. शेतकरी वासाचे दूध परत मागतात, पण तर कायद्याने करता येत नाही. वासाचे दूध संघाने केलं की शेतकऱ्यांनी हे समोर आलं पाहिजे. यासाठी अत्याधुनिक यंत्रणा आली आहे. त्यामुळे वासाच्या दुधाचा निकाल लावा अशा पद्धतीचे वक्तव्य माझं होतं अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.
गोकुळचा चेअरमन महायुतीचा आहे. त्यामुळं महायुतीतील नेत्यांनी आचारसंहिता पाळली पाहिजे. महायुतीत मिठाचा खडा पडेल असं कुणीही बोलू नये, मागील वेळी 3 हजार 800 सभासद होते. आता 5000 सभासद आहेत. त्यामुळे गोकुळची पूर्ण निवडणूक आता सभासदांच्या हातात गेली आहे. गोकुळचा कारभार 100 टक्के नाही पण 90 टक्के कारभार सुधारला आहे. अशा शब्दात मंत्री हसन मुश्रीफ यांनी इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना याबद्दल तक्रार झाली होती. त्याच वेळी टेस्ट ऑडिट झालं आहे. यामध्ये काही निष्पन्न झालेले नाही. ज्यांनी याचिका केली आहे. कदाचित सर्किट बेंचला याबाबत कल्पना नसेल, ज्यावेळी कोर्टाची नोटीस येईल त्यावेळी त्याचे निराकरण केलं जाईल, असे स्पष्टीकरण मंत्री मुश्रीफ यांनी दिले.
गोकुळचे संचालक हे स्वतःच्या पैशाने गोव्याला सहलीला गेले होते. स्वतःच्या पैशाने संचालक गेले. असतील तर हरकत घ्यायचं कारण काय? घड्याळ आणि ब्लॅंकेट खरेदीची देखील चर्चा झाली. गोकुळने सांगितलं आहे की जी खरेदी केली आहे ती योग्य पध्दतीने केली आहे, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.
मनोज जरांगे पाटील गणेशोत्सवात संयमाने घेतील अशी आशा आहे. राज्य सरकारची समिती जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत. सणवार असल्याने मनोज जरांगे पाटील देखील सरकारचे ऐकतील असं वाटतं, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले. ऐन सणाच्या दिवशी शहरात पाणी पुरवठा होत नसेल तर दुर्दैव आहे. कोल्हापूरकरांना पाणी देणार नसू तर लोकांची नाराजी उफाळून येईल. थेट पाईपलाईनमध्ये जी काही अडचण येत असेल तर तातडीने सोडवलं पाहिजे.
प्र.१. धनंजय महाडिक यांचा दहीहंडी कार्यक्रम कधी झाला?
उ. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांचा दहीहंडी कार्यक्रम झाला.
प्र.२. मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोणता मुद्दा उपस्थित केला?
उ. वासाच्या दुधाचा प्रश्न उपस्थित करून त्यावर तातडीने निकाल लावण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
प्र.३. गोकुळ डेअरीवरून वाद का पेटला आहे?
उ. गोकुळच्या चेअरमन पदावर महाडिक कसे आले यावरुन राजकीय टीका होत असून त्यासोबतच दूध शेतकऱ्यांच्या समस्या चर्चेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.