Gokul Politics: कधी शिवसेनेच्या तर कधी राष्ट्रवादीच्या मंचावर..! 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष नेमके अजितदादांचे की शिंदेंचे..?

Kolhapur Mahayuti News : महायुतीमधील राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेनेचे सर्वच आमदार पदाधिकारी गोकुळच्या निवडणुकीत महायुती म्हणून उतरणार आहेत. अशातच मंत्री मुश्रीफ यांच्याकडे या निवडणुकीतील नेतृत्व जाण्याची शक्यता आहे.
Arun Dongle
Arun DongleSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. अरुण डोंगळे यांची राजकीय दोलायमान भूमिका – कधी शिवसेनेच्या तर कधी राष्ट्रवादीच्या मंचावर उपस्थित राहून त्यांनी दोन्ही पक्षांशी संपर्क कायम ठेवला आहे.

  2. गोकुळ दूध संघातील वाद आणि राजीनामा – अध्यक्षपदाच्या मुदतीत निर्माण झालेल्या वादामुळे डोंगळे यांच्यावर टीका झाली, पण पुत्राला उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी राजीनामा दिला.

  3. आगामी निवडणुकांकडे लक्ष – गोकुळ दूध संघाची आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लक्षात घेऊन त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीकडे कल दाखवला आहे.

Kolhapur News : गोकुळचे माजी अध्यक्ष आणि संचालक अरुण डोंगळे यांची उपस्थिती कधी शिवसेनेच्या स्टेजवर तर कधी राष्ट्रवादीच्या स्टेजवर पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी डोंगळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिक जवळचे झाले असून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. दोन दिवसांपूर्वी झालेल्या राहुल पाटलांच्या राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत देखील डोंगळे हे स्टेजवर होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक आणि आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मंत्री यांच्याशी सूत जमवण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे डोंगळे साहेब आता तुम्हीच सांगा कोणाचे? अशी वेळ कार्यकर्त्यांसह दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रचाराच्या माध्यमातून गोकुळचे (Gokul) माजी अध्यक्ष अरुण डोंगळे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आले. हळूहळू शिवसेनेतील संपर्क वाढत गेला. आबिटकर यांच्या आभार मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अरुण डोंगळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सातत्याने संपर्क वाढल्याने डोंगळे हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात सुरू होती.

Arun Dongle
Manoj Jarange : मनोज जरांगेंना अखेर परवानगी मिळाली! आझाद मैदानात आंदोलन करता येणार; पण...

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आभार मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अरुण डोंगळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सातत्याने संपर्क वाढल्याने डोंगळे हे शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा जोरात सुरू होती.

गोकुळ दूध संघातील अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर उर्वरित एक वर्षासाठी अध्यक्षपदासाठी राजीनाम्याची गरज असताना डोंगळे यांनी नकार दर्शवला. गोकुळचे राजकारण थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समक्ष नेल्याने गोकुळच्या दुधाला आणखी उकळी फुटली.

Arun Dongle
Vishal Patil : मतचोरीवरून राजकारण तापलं! जयंत पाटील vs गोपीचंद पडळकर युद्धात आता विशाल पाटीलची एन्ट्री

अध्यक्षपदावरून झालेल्या राजकारणात आणि वादाला अरुण डोंगळे हेच कारणीभूत ठरले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्या पुत्राला राष्ट्रवादीचे युवा जिल्हाध्यक्ष अभिषेक डोंगळे यांना उमेदवारी देण्याची अट मंत्री मुश्रीफ यांच्याकडे ठेवून राजीनामा दिला.

पुढील वर्षी गोकुळ दूध संघाची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. मागील निवडणुकीत गोकुळमधील ज्येष्ठ नेते माजी अध्यक्ष विश्वास पाटील, माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी महाडिक गटाची साथ सोडली. पण आता राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर सत्ता समीकरणे बदलली आहेत.

Arun Dongle
Attack on Minister Video : गावकऱ्यांचा मंत्री अन् आमदारावर हल्ला; 1 किलोमीटर पाठलाग करत हुसकावून लावले...

महायुतीमधील राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेनेचे सर्वच आमदार पदाधिकारी गोकुळच्या निवडणुकीत महायुती म्हणून उतरणार आहेत. अशातच मंत्री मुश्रीफ यांच्याकडे या निवडणुकीतील नेतृत्व जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंगळे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे आपला मोर्चा वळवला आहे.

प्रश्न 1: अरुण डोंगळे कोणत्या पक्षाच्या अधिक जवळ आहेत?
उत्तर: सध्या ते राष्ट्रवादीकडे झुकलेले दिसत आहेत, तरीही दोन्ही पक्षांशी संपर्क ठेवतात.

प्रश्न 2: गोकुळ दूध संघातील वाद का निर्माण झाला?
उत्तर: अध्यक्षपदावरून राजीनाम्याच्या मुद्द्यावरून वाद वाढला आणि डोंगळे यांच्यावर जबाबदारी टाकली गेली.

प्रश्न 3: डोंगळे यांनी राजीनामा का दिला?
उत्तर: आपल्या पुत्राला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी, ही अट ठेवून त्यांनी राजीनामा दिला.

प्रश्न 4: आगामी गोकुळ निवडणुकीत कोणाचे नेतृत्व राहणार?
उत्तर: मंत्री मुश्रीफ यांच्याकडे नेतृत्व जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com