Dhananjay Mahadik Vs Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics: मुन्ना-बंटी पुन्हा भिडणार! निवडणुकीच्या तोंडावरच वाद

Dhananjay Mahadik Vs Satej Patil: विकास कामासंदर्भात केलेल्या टीकेकरून 'पुन्हा एकदा या' आरोप प्रत्यारोपाच्या संघर्षाला धार मिळणार आहे. निवडणुकीच्या तोंडावरच हा वाद आता सुरू होण्याची चिन्हे आहेत.

Mangesh Mahale

Kolhapur News: कोल्हापूर महापालिका आणि जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि काँग्रेस नेते, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा खेळ पुन्हा एकदा रंगणार आहे.

नुकत्याच दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या फराळ कार्यक्रमात मुन्ना महाडिक यांनी बंटी पाटील यांच्यावर टीका केली आहे. विकास कामासंदर्भात केलेल्या टीकेकरून 'पुन्हा एकदा या' आरोप प्रत्यारोपाच्या संघर्षाला धार मिळणार आहे. निवडणुकीच्या तोंडावरच हा वाद आता सुरू होण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर महापालिकेवर वर्षानुवर्षे सत्ता असूनही शहरामध्ये कोणतीही भरीव विकासकामे आमदार सतेज पाटील यांनी केलेली नाहीत. खराब रस्ते, वाहतूक कोंडी, अनियमित पाणीपुरवठा या समस्या तशाच आहेत. थेट पाईपलाईनसारखी योजना पूर्ण करण्यास त्यांना १४ वर्षे लागली. त्यांनी कोल्हापूरला ५० वर्षे मागे नेले,' असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला. लक्ष्मीपुरी भाजप मंडलच्या फराळ कार्यक्रमात ते बोलत होते.

खासदार महाडिक म्हणाले,'आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीचीच सत्ता येणार आहे. कारण काँग्रेसच्या काळात शहरातील समस्यांचे निराकरण झाले नाही.शहराला नियमित पाणीपुरवठा होत नाही. थेट पाईपलाईन योजना पूर्ण व्हायला १४ वर्षे लागली. त्यानंतरही या योजनेतील पाणी नियमितपणे मिळत नाही.

रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी या समस्या तशाच आहेत. पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. महापालिकेतील भ्रष्टाचारामुळे कोल्हापूरची प्रतिमा डागाळली आहे. सतेज पाटील यांची महापालिकेत सत्ता असूनही त्यांनी भरीव विकासकामे केलीच नाहीत. उलट जी विकासकामे सुरू होती, त्यामध्ये खो घालण्याचे काम केले.

स्वबळाची तयारी ठेवा

या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव हे देखील उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना ज्या प्रभागात अनेकांची मक्तेदारी आहे. हे मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सज्ज रहा. 'महायुती म्हणून निवडणूक लढवावी, असा विचार सुरू आहे, मात्र जर उमेदवारीबाबत निर्णय होत नसेल तर आमची स्वबळावर लढण्याचीही तयारी आहे. भाजपचे कार्यकर्ते सक्षम आहेत, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT