MLA Shivendraraje Bhosale, MP Udayanraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosale, MP Udayanraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : ग्रेडसेपरेटरचा सर्व्हे 'बनकर कंपनी'ने केला का...शिवेंद्रसिंहराजेंचा खोचक सवाल

Umesh Bambare-Patil

सातारा : ग्रेडसेपरेटरचा सर्व्हे तज्ञांकडून केला असे सांगून ५६ टक्के लोक यातून जातात, असे सांगितले जात आहे. मग हा सर्वे बनकर आणि कंपनीने केला आहे का, असा प्रश्न उपस्थित करून माझ्या बुद्धीची कीव करण्यापेक्षा काम चुकलंय हे मान्य करा, असा टोला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजेंना लगावला आहे.

साताऱ्यातील ग्रेडसेपरेटरच्या कामावरून सध्या दोन राजांमध्ये कलगीतूरा रंगला आहे. पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आरोपप्रत्यारोपांमुळे मात्र, सातारकरांची करमणूक होऊ लागली आहे. ग्रेडसेपरेटरच्या कामावर टीका केल्यावरून उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, अशी टीका केली होती. त्यास आज आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांच्याच स्टाईलने प्रतिउत्तर दिले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ग्रेडसेपरेटर करण्यापूर्वी तज्ञांकडून सर्व्हे झालाय हे ठिक आहे. पण सातारकरांचे म्हणणे खासदारांनी लक्षात घेतले पाहिजे. नागरीकांना वापरण्यासाठी त्यांचा वापर व्हायला पाहिजे होता. किती लोक यातून जातात, असा प्रश्न करून ते म्हणाले, खासदारांनी ५६ टक्के लोक जातात असे सांगितले आहे. मग हा सर्वे कोणी केला.

त्यांचे समर्थक बनकर हे पोवईनाक्यावरच ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे बनकर आणि कंपनीने सर्व्हे केला का, असा खोचक प्रश्न उपस्थित करून त्यांनी सर्व्हे कंपनी काढली का.माझ्या बुध्दीची किव करण्यापेक्षा काम चुकलेले आहे. लोकांचा पैसा वाया गेला आहे, त्यामुळे त्यात सुधारणा करावी. संपूर्ण चुकीचे होऊनही खासदारांना याबाबत काहीही ऐकायचे नाही. मी फार ग्रेट आहे, असाच त्यांना स्वतःचा ढोल वाजवायचा आहे. त्यांना नगरपालिका निवडणूकीत काय ते समजेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT