Satara : ग्रेडसेपरेटर निरूपयोगी म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची किव वाटते... खासदार उदयनराजे

ग्रेडसेपरेटर Grade separator झाल्यामुळे निरिक्षण निष्कर्षानुसार पोवईनाक्यावरील सुमारे 56 टक्के वाहतुक कमी झाली Traffic decreased by 56 percent आहे. आजही ग्रेडसेपरेटरचा वापर गरज असणारे करीत आहेत.
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosalesarkarnama

सातारा : साताऱ्यातील ग्रेडसेपरेटर निरुपयोगी आहे, असे अक्कलेचे तारे तोडणा-यांच्या अफाटबुध्दीमत्तेची किव करावीशी वाटते, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा नामोल्लेख टाळत फटकारले आहे. कोणत्याही सुधारणा पचनी पडण्यास काही कालावधी जावा लागतो, असे ही त्यांनी नमुद केले आहे.

सातारा शहरातील पोवईनाका येथ झालेले ग्रेडसेपरेटरचे काम हे या क्षेत्रातील तज्ञ सी. व्ही. कांड कन्सलटन्सी बाणेर (पुणे) यांच्या सल्ल्यानुसार व केंद्रीय मार्ग निधीतून करण्यात आले आहे. हे काम करण्यापूर्वी या परिसरातील वाहतुकीचे बारकाईने सर्व्हेक्षण केले होते. तसा ग्रेडसेपरेटर बनवण्याचा सुक्ष्म निरिक्षण अहवाल आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी 'ग्रेडसेपरेटर' सातारकरांच्या माथी मारला... शिवेंद्रसिंहराजे

त्यामुळे ग्रेडसेपरेटर एक निरुपयोगी आहे असे अक्कलेचे तारे तोडणा-यांच्या अफाट बुध्दीमत्तेची किव करावीशी वाटते. ग्रेडसेपरेटरची आवश्यकता जाणुन केंद्रीय मार्ग निधीमधुन नितीन गडकरी यांच्याकडून हा ग्रेडसेपरेटर उभारण्याच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. सर्वेक्षणामध्ये पोवईनाका येथे सर्व प्रकारची वाहने प्रति तास 12,237 आणि प्रतिमिनीट 185 इतक्या संख्येने वाहने जात होती, असा साधार निष्कर्ष नोंदविला आहे.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
सातारा पालिकेत ५० जागा जिंकणार; मिशीला पीळ, ताव मारून होत नसतं... उदयनराजे

तसेच या ठिकाणी आठ रस्ते एकत्र येत असल्याने आयआरसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रेडसेपरेटरचे डिझाईन तयार करण्यात आलेले आहे. ग्रेडसेपरेटरपूर्वी पोवईनाक्यावरुन दिवसभरात एसटीच्या 3226 फे-या ये-जा करीत असत. आज या वाहनांचा पडणारा मोठा भार कमी झाला आहे. त्यामुळे इंधन आणि प्रवासाची बचत झाली आहे. ग्रेडसेपरेटर झाल्यामुळे निरिक्षण निष्कर्षानुसार पोवईनाक्यावरील सुमारे 56 टक्के वाहतुक कमी झाली आहे. आजही ग्रेडसेपरेटरचा वापर गरज असणारे करीत आहेत.

Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Satara: पालिकेची निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी.. शिवेंद्रसिंहराजे

त्यामुळेच सर्व तांत्रिक बाजुंचा या विषयात तज्ञ असणा-यांनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अभियंत्यांच्या देखरेखीखाली पोवईनाका येथे ग्रेडसेपरेटर उभारणेत आले आहे. आता कोणीतरी आगंतुकाने उठावे आणि ग्रेडसेपरेटर बिनकामाचा आहे, असे म्हणावे किंवा ग्रेडसेपरेटरमध्ये 'हॉरर शो' चे आयोजनास परवानगी ज्यांनी पालिकेकडे मागितली. त्या अज्ञानी परंतु सज्ञान व्यक्तींच्या प्रगल्भ विचारांची किव वाटते. परंतु यानिमित्तान संबंधितांची वैचारिक दिवाळखोरी मात्र, जनतेसमोर आली आहे, असा टोलाही उदयनराजेंनी लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com