Mumbai News : माझ्या इस्लामपूर-वाळवा मतदारसंघासाठी ५८० कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मी कुणाकडे मागणी केलेली नाही, तसे पत्रही कुणाला दिलेले नाही. मला ५८० कोटी रुपयांचा निधी मिळालेला नाही, तर २० ते २२ कोटी रुपये मिळाले आहेत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेतच दिले. (Did Jayant Patil get 580 crores of funds?)
निधी वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अगदी विधीमंडळातही विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ५८० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे वृत आज एका दैनिकात छापून आले आहे. त्यावर आमदार पाटील यांनी पॉईंट ऑफ इर्न्फेमेशनच्या द्वारे विधानसभेत स्पष्टीकरण दिले.
जयंत पाटील म्हणाले की, निधीवाटपासंदर्भातील बातमी मी वाचली. त्यात माझ्या नावासमोर ५८० कोटी रुपयांचा निधी नमूद करण्यात आलेला आहे. मात्र, मला इतका निधी मला प्राप्त झालेला नाही. एवढा निधी मिळावा, यासाठी मी कोणाला पत्र लिहिलेले नाही. मुळात हे आकडे खरे आहेत, असंही मला वाटत नाही. ५८० कोटी रुपयांवरून लोकांचा गैरसमज होईल की एवढे पैसे एकाच मतदारसंघात कसे काय देण्यात आले.
मला एवढा निधी द्यावा, अशी मागणी मी केलेली नाही. मी ५८० हा आकडा तपासला तेव्हा, तो आकडा खरा नसल्याचे दिसून आले. एवढे पैसे माझ्या मतदारसंघाला मिळालेले नाहीत. तेवढ्या सत्ताधारी बाकाकडून किती मिळाले, ते सांगा, असा आग्रह धरण्यात आला. तेव्हा जयंत पाटील यांनी साधारणपणे २० की २२ कोटी रुपये आहेत, असे स्पष्ट केले. पाचशे ऐंशी कोटी कुठे आणि २० ते २२ कोटी कुठे, असा सवालही पाटील यांनी केला.
जयंत पाटील म्हणाले की, मला ५८० कोटी रुपयांचा निधी मला मिळालेला नाही. त्यामुळे गैरसमज पसरविण्याचे काम होत आहे. मी व्हाईट बुक तपासलं, त्यात मला एवढा मोठा कोणताही निधी मिळाला नसल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे गैरसमज होऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.