Solapur News : सोलापूर जिल्हा प्रशासनाने 20 मार्चला जिल्ह्यात पेट्रोल किंवा डिझेल खुल्या प्लास्टिक बाटली किंवा अनधिकृत कंटेनरमध्ये पेट्रोल पंपावरून भरून देणे, विकणे नियमाविरुद्ध आणि बेकायदेशीर असल्याने जाहीर करत आदेश दिले होते. मात्र, आता जिल्हा प्रशासनाने नवे पत्रक काढत प्रशासनाने 20 मार्च आदेश रद्द केला आहे.
प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालक मालक यांनी पेट्रोल, डिझेल हे केवळ वाहनाच्या इंधन टाकीतच वितरित करावे. कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल/डिडोल खुले (कॅन, बाटली, डबा किंवा इतर कोणत्याही भांडयात) विक्री/पुरवठा करू नये, असे आदेश दिले होते.त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता होती.
स्प्रेयर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, डिझेल जनरेटर अशी यंत्रे शेतातच असल्यामुळे शेतकरी सहसा कॅन/ड्रममध्येच डिझेल घेऊन जातात. कामं थांबवून 10-15 किमीवर असलेल्या पंपावर ही यंत्रं न्यायला शेतकऱ्याला वेळेच्या आणि पैशांच्या दृष्टीनेही परवडत नाही. त्यामुळं सरकारने शेतकऱ्यांसाठीही काहीतरी मध्यम मार्ग काढावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. दरम्यान, प्रशासनाने तो निर्णय रद्द केला आहे.
इंधन उपलब्धतेबाबत अप्रमाणित माहिती पसरवून नागरिकांमध्ये घबराट निर्माण केल्याप्रकरणी पुणे कॅन्टोनमेंट परिसरातील हायवे पेट्रोलियम सेंटर (पूलगेट) या पेट्रोल पंपावरील विक्री व इंधन पुरवठा तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याची कारवाई पुणे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. सदर पेट्रोल पंप चालकास २४ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच समाधानकारक उत्तर न मिळाल्यास डीलरशिप रद्द करण्यासह पुढील कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तेल कंपनीच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.