Devendra Fadnavis-Sachin Kalyashetti-Dilip Mane-Suresh Hasapure 
पश्चिम महाराष्ट्र

Dilip Mane : दिलीप मानेंनी सांगितला मुख्यमंत्री फडणवीसांसमोर ठरलेला सभापतिपदाचा फॉर्म्युला....

Solapur Bazar Samiti Sabhapati Post : मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दलही मी त्यांचा ऋणी आहे. बाजार समितीच्या सभापतिपदाच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी, हमाल तोलार या सर्व घटकांसाठी चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 11 May : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे माजी आमदार दिलीप माने यांची निवड झाली आहे. त्यांची निवड पहिल्या दोन वर्षांसाठी असणार आहे. मात्र, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि राजशेखर शिवदारे यांनी निवडणूक लढवली होती, त्यामुळे सभापती, उपसभापतिपदाच्या वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार, याची उत्सुकता होती. नवनिर्वाचित सभापती दिलीप माने यांनीच बाजार समितीच्या सत्तावाटपाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठरलेला फॉर्म्युला जाहीर केला आहे.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane), सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांना सोबत घेऊन सोलापूर बाजार समितीची निवडणूक लढवली होती. यामध्ये दिलीप माने आणि सुरेश हसापुरे हे सभापतीपदासाठी तीव्र इच्छूक असलेले नेते होते. तसे त्यांच्याकडे सहकार सोसायट्यामधील मतदारही होता. त्यामुळे सत्ता वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावर खुद्द नवनिर्वाचित सभापती दिलीप माने यांनी भाष्य केले आहे.

सोलापूर बाजार समितीचे सभापतिपद हे पहिले दोन वर्षे माझ्याकडे, त्यानंतर दोन वर्षे हे सुरेश हसापुरे यांच्याकडे राहणार आहे, असं आमचं ठरलं आहे. शेवटच्या एक वर्षाबाबत काही ठरलेले नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितलं आहे. त्याप्रमाणेच आमचं नियोजन होणार आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही, असेही दिलीप माने यांनी स्पष्ट केले.

सभापती माने म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवली होती. फडणवीस यांच्या आदेशाप्रमाणेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पॅनेलप्रमुख म्हणून पॅनेल ठरवण्यापासून आजच्या सभापती आणि उपसभापती निवडीपर्यंत अतिशय चांगलं काम केलं आहे. सर्व संचालकांना विश्वासात घेऊन आमदार कल्याणशेट्टी यांनी मला सभापती होण्याचा मान दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दलही मी त्यांचा ऋणी आहे. बाजार समितीच्या सभापतिपदाच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी, हमाल तोलार या सर्व घटकांसाठी चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याला पात्र राहून मी निश्चितपणे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही माने यांनी नमूद केले.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील विजयानंतर आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. बाजार समितीतील विजयाबद्दल फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले होते, त्याचवेळी सभापतिपदाबाबतचा फॉर्म्युला ठरला होता, हे माने यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT