Manikrao Kokate Politics: मंत्री झालेले कोकाटे यांची पहिली परीक्षा सिन्नर नगरपालिका निवडणुकीत, काय असेल रणनीती?

खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नर नगरपालिकेत नगराध्यक्षांसह २१ नगरसेवक असल्याने वर्चस्व. कोकाटे यांचे १० नगरसेवक आहेत.
Rajabhau Waje & Manikrao Kokate
Rajabhau Waje & Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Kokate Vs Waje News: लोकसभा निवडणुकीत माणिकराव कोकाटे यांनी राजकीय मैदानात उतरणे टाळले होते. विधानसभा निवडणुकीत कोकाटे यांना खासदार वाजे तटस्थ राहिल्याने लाभ झाला. मात्र या दोन्ही नेत्यांची आता राजकीय सत्वपरीक्षा होणार आहे.

सिन्नर नगरपालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. प्रशासकांवर सत्ता म्हणून मंत्री माणिकराव कोकाटे यांचे नियंत्रण आहे. त्यामुळे एक प्रकारे कोकाटे हेच नगरपालिकेचा कारभार हरकत आहेत, असे म्हटल्यास वावगे नाही. त्यामुळे त्यांनी दोन वेळा नगरपालिकेत बैठक घेऊन प्रशासनाला सूचनाही केल्या आहेत.

Rajabhau Waje & Manikrao Kokate
Kirit Somaiya Politics: देशभऱ सर्व धर्मीय एकोपा, किरीट सोमय्या यांचे राजकारण मात्र मशिद आणि भोंगे यातच अडकले!

गेल्या निवडणुकीत सिन्नर नगरपालिकेत भाजपचे माणिकराव कोकाटे विरुद्ध शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्यात थेट लढत झाली होती. अन्य उमेदवार आणि पॅनल हे दुय्यम होते. निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक केली होती. यंदा पुन्हा एकदा कोकाटेंचे पक्ष आणि चिन्ह बदलणार, खासदार वाजे शिवसेना ठाकरे पक्षातच आहेत.

Rajabhau Waje & Manikrao Kokate
Kirit Somaiya Politics: देशभऱ सर्व धर्मीय एकोपा, किरीट सोमय्या यांचे राजकारण मात्र मशिद आणि भोंगे यातच अडकले!

गेल्या निवडणुकीत मंत्री कोकाटे यांना दहा तर खासदार वाजे यांना १८ जागा मिळाल्या होत्या. लोकनियुक्त नगराध्यक्ष किरण डगळे हे वाजे गटाचे निवडून आले होते. त्यानंदर २ स्विकृत वाजे गटाचे तर एक स्विकृत नगरसेवक कोकाटे गटाचा झाला. या कलावधीत शहराला 24 तास पाणीपुरवठा, गटार योजना आणि शहरातील सुविधा हे मुख्य प्रश्न होते. मात्र कोकाटे आमदार तर वाजे माजी आमदार असल्याने नगरपालिकेला सत्तेचा फारसा लाभ झाला नाही.

मंत्री कोकाटे यांनी नगरपालिकेत सत्ता असताना शहराला २४ तास पाणी योजना देण्यासाठी घोषणा केली होती. त्यासाठी कडवा धरणातून थेट पाणीपुरवठा योजना होती. आपल्या कार्यकाळात कोकाटे यांना शहराला २४ तास पाणी देता आले नाही. त्यातूनच मतदारांनी नगरपालिकेची सत्ता खासदार वाजे यांच्याकडे सोपविली होती.

शहराचे तेच जुने प्रश्न अद्यापही कायम आहेत. त्याच्या निवडणुकीतही त्यावरच मते मागितली जातील. मात्र आता श्री कोकाटे राज्याचे कृषिमंत्री आहेत. त्यामुळे त्यांची राजकीय पत आणि प्रतिष्ठा या दोन्हींची परीक्षा नगरपालिका निवडणुकीत होईल. कोकाटे हे आक्रमक भाषणे अन् मतदारांचा कल पाहून वक्तव्य करण्यात तरबेज आहेत. त्याचा पुरेपूर राजकीय लाभ त्यांना होत आला आहे.

खासदार वाजे गंभीर वक्तृत्व अन् नेतृत्व असलेले नेते म्हणून परिचीत आहेत. जनतेच्या सेवेत ते सक्रीय असल्याने त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे. आता खासदार वाजे आणि मंत्री कोकाटे यांच्यात थेट सामना होत आहे. त्यामुळे तो नक्कीच चुरशीचा असेल. दोन्ही नेत्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी नगरपालिका निवडणूक महत्त्वाची आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com