Solapur Politics
Solapur Politics 
पश्चिम महाराष्ट्र

राजकारण तापलं! स्फोटकांप्रकरणी दिलीप सोपलांचा आमदारावर गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो

Solapur Politics| सोलापूर : माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगल्याच्या गेटवर आणि गेटच्या आतमध्ये स्फोटके फोडल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दिलीप सोपल यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांनी ही स्फोटके गेटच्या आत फोडल्याचा आरोप दिलीप सोपल यांनी केला आहे. स्फोटके फोडतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आज (3 नोव्हेंबर) बार्शी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या रात्री २३ ऑक्टोबरला मध्यरात्री घडली होती. त्यानंतर सोपल यांनी 24 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती. पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता. दिलीप सोपल यांनी आज स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून स्फोटके फोडणाऱ्यांच्या नावांसह फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. नागेश मोहिते, नीलेश मस्के, अंबादास रणझुंजारे, महेश पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

दिलीप सोपल आणि राजेंद्र राऊत या दोन्ही नेत्यांमध्ये सतत राजकीय वाद उफाळून येत असतो. आता या प्रकरणामुळे पुन्हा दोघांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. आर्यन शुगर या साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे थकवलेले बील देण्यावरुन दोन महिन्यांपूर्वीच दोन्ही नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. दिलीप सोपल यांच्यांवर ईडीची चौकशी लावण्याचा इशारा राजेंद्र राऊत यांनी दिला होता. लोकांचे पैसे बुडवून आमचा काही संबंध नाही म्हणायचं. ही मग्रूरीची भाषा चालणार नाही. आता ई़डी, इन्कम टॅक्स आहे, माझा काय संबंध असे म्हणून चालणार नाही, असा इशारा राजेंद्र राऊत म्हणाले होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT