Chandrakant Patil : 'दादां'नी लावली 'दादां'च्या विकासकामांना कात्री!

Chandrakant Patil : राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी व मतदारसंघतील विकासकांमाना कात्री लावल्याचेही बोलले जात आहे.
Chandrakant Patil-Ajit Pawar
Chandrakant Patil-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

पुणे : पुणे जिल्ह्याच्या वार्षिक आराखडा निधी वितरणात आता राजकारण होताना दिसत आहे. एकीकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वार्षिक आराखड्यातील जवळपास ३०३ कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी दिली. मात्र आधीच्या पालकमंत्री अजित पवार यांनी मंजूर केलेल्या निधीला दादांनी कात्री लावल्याचीही चर्चा आहे. यामुळे आता एका दांदानी दुसऱ्या दादांवर राजकीय कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे.

Chandrakant Patil-Ajit Pawar
Ashok Chavhan : चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात? श्रीजया यांच्या फ्लेक्सची एकच चर्चा!

पुणे जिल्ह्याच्या वार्षिक आराखड्यातील जवळपास ३०३ कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या विकासकामांना पालकमंत्री पाटलांनी मंजूरी दिली. मात्र ही मंजूरी देताना त्यांनी मागील सरकारमध्ये अजित पवार पालकमंत्री असताना मंजूर केलेल्या कामांचा पाटील यांनी संपूर्ण आढावा घेतला.

यावेळी पाटलांनी तत्कालीन राज्यसरकार मधील मंत्र्यांना आणि आपल्या पक्षातील आमदारांना जास्त निधी दिल्याचा दावा केला. यामुळे पवारांनी मंजूर केलेल्या निधींना पाटील यांनी कात्री लावली आहे. यामध्ये बारामती मतदार संघातील विविध विकास कामांनाही फटका बसणार आहे. यामुळे कोल्हापूरच्या दादांनी पुण्याच्या दादांच्या विकासकामांना कात्री लावल्याची चर्चा होत आहे.

Chandrakant Patil-Ajit Pawar
पुणेकरांचे कोट्यवधी रूपये खर्च झालेल्या 'बीआरटी मार्ग' बंद होण्याच्या मार्गावर!

चालू आर्थिक वर्षाच्या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत महाविकाल आघाडी पडले. सरकार कोसळल्यानंतर नव्याने स्थापन झालेले शिंदे फडणवीस सरकारने, कार्यरत आसलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सर्व कामांना तातडीने स्थगितीचे आदेश दिले होते.

यामुळेच १ एप्रिलपासून जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्हा नियोजन समिती निधी हा जिल्हा परिषदेला प्राप्त होऊ शकलेला नाही. पाटील यांनी जिल्हा वार्षिक आराखड्यांतील विकासकामांचा फेरआढावा घेतला होता. यात त्यांनी काही बदल केलेत, तर राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी व मतदारसंघतील विकासकांमाना कात्री लावल्याचेही बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com