Rahul Kul, Ramesh Thorat Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Daund APMC News : दौंड बाजार समितीत कुल-थोरात आमने-सामने; बाजी कोण मारणार?

NCP vs BJP : राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलची उमेदवारांची यादी जाहीर

सरकारनामा ब्युरो

Ramesh Thorat and Rahul Kul : दौंड बाजार समितीच्या १८ जागांसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष मिळून एकूण ३९ उमेदवार रिंगणात आहेत. आज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पॅनेलच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. तर भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वातील भाजप पुरस्कृत पॅनेलही लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे दौंड बाजार समितीत कुल-थोरात यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान या भाजप-राष्ट्रवादीमधील लढतीत बाजी कोण मारणार, याची उत्सुकता कायम आहे.

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी तब्ब्ल २०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील १६७ जणांनी आपले अर्ज माघार घेतले आहेत. त्यामुळे आता १८ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान माजी आमदार रमेश थोरात (Ramesh Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलने सर्व उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात १८ पैकी तब्बल १७ उमेदवार नवे आहेत. तर एका जुन्या संचालकाला उमेदवारी दिली आहे. माजी सभापती, उपसभापतीसह व संचालकांना पुन्हा संधी नाकारल्याने तालुक्यातून आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत निर्माण झालेल्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार रमेश थोरात यांचे वर्चस्व आहे. आता या निवडणुकीसाठी दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांनीही पॅनेल उभा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपुढे भाजपचे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या समर्थकांनी अर्ज माघार घेतले आहेत. याचा फटका भाजप (BJP) पुरस्कृत पॅनेलला बसण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

दौंड बाजार समिती सहकारी संस्थांच्या ११, ग्रामपंचायत ४, व्यापारी २, हमाल १ अशा एकूण १८ जागा आहे. या जागांसाठी एकूण दोन हजार ६६७ मतदार मतदान करणार आहेत. त्यात सरकारी संस्थेत १ हजार ५६९, ग्रामपंचायत ८७६, व्यापारी १८९ व हमाल ३३ अशा मतदारांचा समावेश आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT