Paithan Market Committee : भुमरेंकडून भाजपला ठेंगा, तरी शिंदे गटासाठी काम करणार..

Market Committe : भाजपला अपेक्षित जागा देण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे ही युती होवू शकली नाही.
Paithan Market Committee News
Paithan Market Committee NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : पैठण बाजार समितीवर (Market Committee) वर्चस्व कायम राखण्यासाठी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी भाजपला वाटेकरी करुन घेण्यास नकार दर्शवला. दोन-तीन जागांवर भाजपची बोळवण करु पाहणाऱ्या भुमरेंवर नाराजी व्यक्त करत सगळ्या १३ उमेदवारांनी आपले अर्ज आज मागे घेतले. त्यामुळे पैठण बाजार समितीत शिंदे-भाजप युती होवू शकली नाही. असे असले तरी भाजप शिंदेच्या शिवसेनेचेच काम करणार असल्याचे सांगितले जाते.

Paithan Market Committee News
Sambhjai Patil Nilangekar News : महात्‍मा बसवेश्‍वरांचा पुतळा एक इंचही हलवू देणार नाही; मी जनभावने सोबत..

दुसरीकडे ठाकरे गट, राष्ट्रवादी व काॅंग्रेस या तीन्ही पक्षाची (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडी झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध शिंदेची शिवसेना (Shivsena) अशी थेट लढत पैठण बाजार समितीसाठी होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाजार समितीसह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता असल्यामुळे भुमरे यांनी भाजपसोबत युतीचा विचारच केला नाही. (Paithan) त्यामुळे अखेर भाजपच्या १३ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

त्यामुळे शिंदे गट-भाजपची युती झाली नसली तरी कुणीही बंडखोरी करणार नाही, भुमरेंच्याच पॅनलचे काम करणार असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष डाॅ. सुनिल शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. बाजार समितीच्या संचालक पदाच्या निवडणुकी भाजप व शिवसेना( शिंदे गट) यांची युती होवुन निवडणुक लढविली जाईल, असे सांगितले जात होते. परंतु आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री भुमरे यांनी सगळ्याच जागा लढवण्याचा निर्णय घेतला.

भाजपला अपेक्षित जागा देण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे ही युती होवू शकली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत पंचायत निवडणुकीत भुमरे शिवसेनेत असताना वर्चस्व राहिले ते वर्चस्व आता शिवसेनेचे दोन गट झाल्यामुळे कितपत टिकुन राहते? असा ही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.भाजपच्या तालुकाध्यक्षांनी भुमरेंचेच काम करणार असे सांगितले असले तरी प्रत्यक्ष प्रचार आणि मतदानाच्या वेळी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते काय भूमिका घेतात? यावर निकाल अवलंबून असणार आहे.

भुमरे यांनी मात्र बाजार समितीची निवडणूक स्वबळावरच लढवण्याचे ठरवले आहे. दरम्यान, भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनी माघारी नंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेवुन चर्चा केली. भुमरे यांच्या सोबत बाजार समितीच्या एकुण १८ संचालक पदाच्या जागा बाबत चर्चा केली असता त्यांनी भाजपने मागितलेल्या अपेक्षित जागा देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर शिंदे यांनी वरिष्ठ नेत्यांना याबाबत माहिती देवून माघार घेतली. निवडणुकीत भाजप युतीचेच काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com