Ganpatrao Deshmukh and Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Babasaheb Deshmukh : मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशीच शेतकऱ्यांची वीज तोडणी; बाबासाहेब देशमुखांच्या पोस्टची चर्चा

Eknath Shinde : ''वाढदिवस भव्यदिव्य साजरा करा, पण सोबतच शेतकरी- कामगारांचे हित ही लक्षात घ्या...''

सरकारनामा ब्यूरो

सांगोला : वीजबिलाअभावी शेतकऱ्यांची वीज तोडणी करण्यात येत असल्याने शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ.बाबासाहेब देशमुख हे आक्रमक झाले आहेत. याबाबत सरकारने योग्य तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आज (दि.9 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वाढदिवसादिवशी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सोशल मीडियावर वीजतोडणीबाबत पोस्ट शेअर करत वाढदिवस भव्यदिव्य साजरा करा, पण सोबतच शेतकरी- कामगारांचे हित ही लक्षात घ्या, असे आवाहन त्यांनी केलं.

डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी पोस्टमध्ये काय म्हटलं?

"जन्मदिनाचे औचित्य साधून गावोगावचा वीज पुरवठा तोडला जात आहे आणि तुम्ही शुभेच्छांचा स्वीकार करत आहात! हे कसले अभिष्टचिंतन वाढदिवसाचे करता आहात? जन्मदिनी काहीच मागणी करत नाही, पण किमान आहे ते पीक तरी घरात येऊ द्या. हातात पडू द्या शेतकरी गोरगरिब जनतेला तुम्ही आधार देण्याऐवजी, गावोगावची वीजतोडणी करून जन्मदिवसाचे परतावा/रिटर्न गिफ्ट देत आहात का?

तुम्ही मोठे आहात मान्य आहे. अन्यायाविरोधात लढा घेऊन तुम्ही सर्वांचा रोष ओढवून सरकार स्थापन केलंत पण आज काय अवस्था जनतेची आहे हे ही लक्षात घ्या. गावोगावची वीज तोडणी जोमात चालू आहे, या अन्यायाची वाचा फोडावी तर कुणासमोर? तुमचा वाढदिवस आहे. दीर्घायुष्याच्या तुम्हास शुभेच्छा! वाढदिवस भव्यदिव्य साजरा करा, पण सोबतच शेतकरी- कामगारांचे हित ही लक्षात ठेवा," असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

दरम्यान, ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर यावर मोठी चर्चा झाली. त्यानंतर यावर सत्ताधारी आणि विरोधक कार्यकर्त्यांनीही आपआपले मत व्यक्त केले. शेतकरी आधीच संकटात आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकर्‍याचे कंबरडे मोडले आहे.

त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. असे असताना शेतकर्‍यांकडून थकीत वीजबिलाची वसुली केली जातेय. सरकारने शेतकर्‍यांची वीजतोडणी करु नये, अन्यथा या विरोधात आंदोलन छेडले जाईल, असेही डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT