Maharashtra Congress : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या दरम्यान अनेक राजकीय घडमोडी घडल्या. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी करत निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. मात्र, याच दरम्यान सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांना पक्षाने निलंबित केलं.
त्यानंतर काँग्रेसचे (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा आपल्या पक्षश्रेष्ठींकडे दिला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. मात्र, आता या प्रकरणाची थेट काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडकडून गंभीर दखल घेतली गेली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अनेक घडमोडी घडल्याच्या पार्श्वभूमीवर आता राज्याचे प्रभारी एच.के.पाटील (H.K.Patil) हे मुंबईत दाखल झाले आहेत. ते बाळासाहेब थोरातांची भेट घेणार असून या भेटीत नेमकं काय चर्चा होती हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
थोरात यांची भेट घेतल्यानंतर एच.के.पाटील हे काँग्रेस पक्षातील नेत्यांबरोबर बैठक घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर याआधी एच.के. पाटील यांना तातडीने दिल्लीत दाखल होण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर आता पाटील मुंबईत आले आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यामध्ये वाद रंगला होता. तसेच थोरातांनी पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. याबाबतचे पत्रही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिले असल्याचे त्यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.