Manish Kalje, Eknath Shinde, Tanaji Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dispute In Shinde group : शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा तानाजी सावंतांवर हल्लाबोल; ‘अल्टिमेटम देणं थांबवा, अन्यथा...’

Shiv Sena Leader warning to Tanaji Sawant : मुख्यमंत्र्यांनी आपणाला आरोग्य मंत्री केलं. मात्र, तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच अल्टीमेटम देणार असाल, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. तुमचा एक पुतण्या शरद पवारांना भेटतो, दुसरा पुतण्या पक्षाला सांगतो की, आमचा विचार केला नाही तर आम्ही वेगळा विचार करू

विश्वभूषण लिमये

Solapur, 31 August : राज्याचे आरोग्य मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांना पक्षातूनच खडे बोल सुनावण्यात आले आहेत. तुमचा एक पुतण्या शरद पवारांना भेटतो, दुसरा पुतण्या पक्षाला इशारा देतो, हा अल्टिमेटम देणं आणि पक्षावर मालकी हक्क दाखवणं योग्य नाही. शिवसैनिक हे कधीही सहन करणार नाहीत, असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी दिला आहे. त्यामुळे शिंदे गटातही सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून येते.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant ) यांंचे पुतणे अनिल सावंत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे (Manish Kalje) यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. काळजे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जनतेसाठी उठाव केला. मात्र, नुकतंच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे शरद पवारांना भेटले. आरोग्य मंत्र्यांनीच मला पाठवलं आहे, असा संदेश घेऊन त्यांनी ही भेट घेतली.

तानाजी सावंतांच्या पुतण्याने शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती आमच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दिली आहे. आरोग्य मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबत काम करत असताना एका पुतण्याला पवारांच्या भेटीला पाठवून पक्षाला अल्टीमेटम देणं आणि पक्षावर आपला मालकी हक्क आहे, असं दाखवणे बंद केलं पाहिजे. शिवसैनिक हे कधीही सहन करणार नाहीत, असे खडे बोल मनीष काळजे यांनी तानाजी सावंतांना सुनावले.

जिल्हाप्रमुख काळजे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आपणाला आरोग्य मंत्री केलं आहे. मात्र, तुम्ही मुख्यमंत्र्यांनाच अल्टीमेटम देणार असाल, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील. तुमचा एक पुतण्या शरद पवारांना भेटतो, दुसरा पुतण्या पक्षाला सांगतो की, आमचा विचार केला नाही तर आम्ही वेगळा विचार करू

मागील इतिहास पहिला तर 2019 ला सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या आमदारकीवेळी काय झालं, करमाळ्यात काय झालं..? ज्या पक्षात आपण राहता, त्या पक्षालाच आपण संपावण्याचा किंवा आपल्याच पक्षाचे उमेदवार कशा पद्धतीने पडतील, असा प्रयत्न जर होत असेल तर आम्ही शिवसैनिक हा प्रकार सहन करणार नाही.

यासंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील चार जिल्हाप्रमुख मिळून आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. आरोग्यमंत्र्यांच्या अशा वक्तव्यामुळे पक्षातील खरे आणि निष्ठावंत शिवसैनिक दुखावले जाणार आहेत. पुतण्या आणि भावाच्या माध्यमातून पक्षाला डॅमेज करण्याचा प्रयत्न आरोग्य मंत्र्यांनी थांबवावा, हे योग्य नाहीये, असा सबुरीचा सल्लाही मनीष काळजे यांनी दिला आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT