kumar ashirwad-praniti shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Collector Transfer : प्रणिती शिंदेंचा खळबळजनक आरोप; सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दबावामुळे स्वतःहून बदली करून घेतली...

Praniti Shinde's Sensational Allegations : सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीवर प्रणिती शिंदे यांनी भाजप आणि पालकमंत्र्यांच्या दबावाचा आरोप करत प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Vijaykumar Dudhale

Solapur, 10 April : सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नुकतीच नागपूरला बदली झाली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी भाजप, पालकमंत्र्यांच्या दबावामुळे स्वतःहून नागपूरला बदली करून घेतली, असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

खासदार प्रणिती शिंदे यांनी डीपीडीसीतून निधी मिळत नसल्याबद्दल आरोप करत निधीसाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना निवेदन दिले. त्यानंतर माध्यमाशी बोलताना त्यांनी भाजप, पालकमंत्री गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले.

खासदार शिंदे म्हणाल्या, मी दोन महिन्यांपूर्वी सांगितलं, त्याप्रमाणे पहिली विकेट दोन महिन्यांत जिल्हाधिकारी यांची गेली आहे. सोलापूरला नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार घेतला आहे. कारण जुन्या कलेक्टरनी स्वतःहून कदाचित नागपूरला बदली करून घेतली. कारण सोलापूरमध्ये जे कोणी अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त या सर्वांवर प्रचंड दबाव आपल्याला दिसून येत आहे. अधिकारी हतबल झाले आहेत.

मला अधिकाऱ्यांचे वाईट वाटतंय. संविधानाची शपथ घेऊन कष्ट करत इथपर्यंत येतात आणि राज्यकर्त्यांचा अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव आहे. विरोधी पक्षाचं काम करू नका, याला एकेक करून अधिकारी बळी पडायला लागले आहेत, असा दावाही शिंदे यांनी केला.

त्या म्हणाल्या, प्रत्येक अधिकारी कष्ट करून एवढ्या मोठ्या पदावर येत असतात. प्रत्येक अधिकारी बळी पडतात, असे नाही. अनेकजण देशासाठी, राज्यासाठी आणि जिल्ह्यासाठी काम करत असतात. मी नाव घेऊ इच्छित नाही. पण माझं आणि त्या अधिकाऱ्याचं संभाषण व्हायचं. पण ते म्हणायचे की, ‘मॅडम मै क्या कर सकता हू’ असं जर अधिकाऱ्यांकडून वक्तव्य येत असेल तर शंभर टक्के त्यांनी स्वतःहून बदली करून घेतली असणार.

अजून किती प्रेशर घ्यायचं. शेवटी तुम्ही ज्या संधिवानाची शपथ घेऊन इथं येता. जाणूनबुजून प्रेशरमुळे तुम्हाला संविधानाच्या विरोधात जावं लागत असेल तर तुमच्या आतमधला जो आवाज आहे, तो तुम्हाला किती छळत असेल. कशासाठी आलात आणि सध्या काय करताय? असा सवालही शिंदे यांनी केला.

मी जाहीरपणे बोलतेय ‘अधिकाऱ्यांवर प्रस्थापितांचा दबाव आहे, भारतीय जनता पक्षाचा वरपासून खालपर्यंत सर्व अधिकाऱ्यांवर दबाव आहे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आहे. इथे जेवढे सत्ताधारी आहेत, त्या सर्वांचा अधिकाऱ्यांवर दबाव आहे, असा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला.

काँग्रेस पक्षाच्या खासदाराची कामे करू नका, असा अधिकाऱ्यांवर दबाव आहे. पण जेव्हा तुम्ही आमची कामं थांबवता, तेव्हा तुम्ही आमची कामं थांबवत नाही. तुमच्यासाठी तुमची कामं असतील. कारण प्रत्येक कामातून तुम्ही काय घेता, हे आम्हाला माहिती आहे. पण, गावकऱ्यांची कामं थांबविण्याचे पाप तुम्ही करता, असेही प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT