Mumbai August Kranti Din Program: स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात माझी माती, माझा देश हे राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेले अभियान राबविले जाणार आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात धर्म आणि स्वाभिमान जागवण्याचे काम केले जात आहे. स्वातंत्र्य संग्रामामध्ये योगदान दिलं होतं त्या बलिदानाचे केवळ स्मरण करून चालणार नाही. जात, धर्म, पंथ, भाषा विसरून आपण सगळ्यांनी सोबत आलं पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
ऑगस्ट क्रांती दिनाला आज ८१ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी क्रांती दिनानिमित्त Revolution Day मुंबईतीळ करंटी मैदानात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार Ajit Pawar तसेच मंत्री उपस्थित होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, स्वातंत्र्य संग्राम तसा सोपा नव्हता. आपल्या आयुष्याची राख, रांगोळी केली. त्यांच्या त्यागाने आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्याग आणि बलिदान केलेल्या स्वातंत्र्य विरांना कोटी कोटी प्रणाम करतो. त्यांच्या बलिदान व त्यागामुळेच आपण स्वातंत्र्याचा अमृत क्षण अनुभवत आहोत.
अजित पवार यांनी "जात धर्म पंथ भाषा विसरून आपण सगळ्यांनी सोबत आल पाहिजे. देशात एकता महत्वाची आहे. त्यानुसार आपण सगळ्यांनी याच मार्गावर राहील पाहिजे," असा संदेश दिला. तसेच प्रत्येक गावातील मूठभर माती एकत्र करून मोदींना पाठवणार असल्याची घोषणा केली आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.