Eknath Shinde Shivsena News : कोकणातला 'हा' बडा नेता शिंदेंची साथ सोडणार अन् भाजपात जाणार...! ; ठाकरे गटाच्या नेत्याने वात पेटवली

Maharashtra Politics : '' दीपक केसरकर हुशार, म्हणून मी त्यांना संधी दिली, ते अतिच हुशार निघाले...''
Eknath Shinde MLA Group Latest News
Eknath Shinde MLA Group Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Sawantwadi : एकनाथ शिंदेंसोबत ४० आमदारांनी उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत बंडखोरी केली होती. तेव्हापासून ते आजतागायत ठाकरे गट - शिंदे गट यांच्यातील संघर्ष टोकदार होत आला आहे. तसेच बंडखोर आमदार अपात्र ठरणार असून ते भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार असल्याची आवाई ठाकरे गटाच्या नेत्यांकडून वारंवार उठवली जाते. आता पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या नेत्याने खळबळजनक दावा केला आहे.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत खत वाटपाचा कार्यक्रम पार पडला. ठाकरे गटाचे विधानसभाप्रमुख शैलेश परब यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे गटाचे नेते व शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे भाजपामध्ये जाणार असल्याचे भाकीत केले आहे.

Eknath Shinde MLA Group Latest News
Mla Rajput On Bhumre News : इतका सूडबुद्धीने वागणारा पालकमंत्री कधी बघितला नाही..

परब नेमकं काय म्हणाले..?

परब म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी मला सावंतवाडीतून उमेदवारी दिली होती. मात्र, दीपक केसरकर(Deepak Kesarkar) हुशार, म्हणून मी त्यांना संधी दिली, ते अतिच हुशार निघाले. सत्तेसाठी ते कुणाच्याही माग जातील. केसरकरांनी वेळ आणि शब्द कधीच पाळला नाही, त्यामुळे ते मतदारसंघासाठी किती धावतील ते मतदारांनीच पाहावे असा घणाघात त्यांनी केला आहे.

यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनीही दीपक केसरकरांवर हल्लाबोल केला. नारायण राणें(Narayan Rane) शी कधीही जुळवून घेणार नाही म्हणणाऱ्या केसरकरांच राणेंशी कस जुळलं असा सवाल केसरकरांना केला आहे.

Eknath Shinde MLA Group Latest News
Rahul Gandhi's Lok Sabha: मोठी बातमी ! अखेर राहुल गांधींना खासदारकी बहाल

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंतर आता शिंदे गटात दाखल..

दीपक केसरकर यांनी आत्तापर्यंत काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना –शिंदे गट असा राजकीय प्रवास केला आहे. सावंतवाडीतील दीपक केसरकर यांनी तरुणपणातच राजकारणात एंन्ट्री घेतली. त्यांनी काँग्रेसी विचारसरणीचा पुरस्कार करत त्यांची राजकीय कारकीर्द सावंतवाडी पालिकेतून सुरू झाली. मात्र, ते फार काळ काँग्रेसमध्ये राहिले नाही.

२००९ ची विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्याच प्रवीण भोसलेंना शह देत केसरकरांनी पक्षाकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळविली आणि राष्ट्रवादीत प्रवेशही केला. तेव्हा काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणेंनी केसरकरांना आमदार म्हणून निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याची जोरदार चर्चा त्यावेळी झाली होती.

Eknath Shinde MLA Group Latest News
Bagal Group With BJP: रश्मी बागल पुण्यात अमित शहांच्या व्यासपीठावर; बागल गट भाजपच्या वाटेवर

२०१४ मध्ये मोदी लाट आलेली. भाजप-सेने युती होती. याच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ च्या फडणवीस सरकारमध्ये केसरकरांवर गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी आणि अर्थ व वित्त विभाग देखील सोपवला होता. २०१४ ते २०१९ च्या कार्यकाळात केसरकरांचे पक्षश्रेष्ठींपेक्षा भाजपाच्या नेत्यांशी जास्त जुळायला लागले. फडणवीसांच्या ते खास मर्जीतले होते अशी चर्चा आजही राजकीय वर्तुळात होत असते.

ठाकरे गटाकडून केसरकरांना घेरण्याची तयारी...

पण २०१९ ला महाविकास आघाडी सरकारमध्ये केसरकर दुर्लक्षित राहिले. त्यानंतर संधी साधत काँग्रेसमधून केसरकर नंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना असा प्रवास करत ते शिंदे गटात सामील झाले. आणि महत्वाचं म्हणजे शिंदे गटात ते दुसऱ्या क्रमांकांचे नेते ठरलेच शिवाय मंत्रिपदाची माळही गळ्यात पडली. त्यानंतर शिंदे गटाची बाजू ठामपणे मांडतानाच ठाकरे गटावर टीकेची झोड उठवण्यात केसरकर आघाडीवर असतात. याचदरम्यान, आता ठाकरे गटाकडून केसरकरांना घेरण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com