Monica rajale
Monica rajale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मी शांत असल्याचा गैरफायदा घेऊ नका अन्यथा मलाही तोंड उघडता येते

सरकारनामा ब्युरो

उमेश मोरगावकर

पाथर्डी ( जि. अहमदनगर ) - अहमदनगर जिल्हा परिषद, पाथर्डी नगरपालिका, पंचायत समितीची निवडणूक जवळ आले आहे. त्यामुळे भाजपच्या आमदार मोनिका राजळे ( Monica Rajale ) व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे ( Pratap Dhakane ) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ( Don’t take advantage of me being quiet otherwise I can open my mouth too )

पाथर्डी तालुक्यातील पिंपळगाव टप्पा, जिरेवाडी व कासार पिंपळगाव येथे राजळे यांच्या स्थानिक निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा प्रारंभ राजळे यांच्या हस्ते करण्यात आला. पिंपळगाव टप्पा ते जोगेवाडी या 2 कोटी 40 लाख रुपये खर्चाच्या रस्ताकामाचे भूमिपूजन राजळे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, सकाळीच या कामाचे भूमिपूजन राजळे यांच्या विरोधातील सरपंचाने केल्याने राजळे आक्रमक झाल्या होत्या. या वेळी राहुल राजळे, गोकुळ दौड, विष्णुपंत अकोलकर, काशीबाई गोल्हार, सुनील ओव्हळ, धनंजय बडे, अजय रक्ताटे, महादेव जायभाय उपस्थित होते.

मोनिका राजळे म्हणाल्या, मी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेणाऱ्या आपल्या विरोधकांनी, मी शांत असल्याचा गैरफायदा घेऊन नये, अन्यथा मला सुद्धा तोंड उघडता येते, असा इशारा आमदार मोनिका राजळे यांनी प्रताप ढाकणे यांचा नामोल्लेख टाळून ​दिला.

राजळे पुढे म्हणाल्या, की आमदार, खासदारांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी नियोजित कार्यक्रमापूर्वीच सरपंच नारळ फोडतात. हे खेदजनक आहे. रस्त्याच्या कामासाठी सरपंच अडीच कोटी निधी आणू शकतो का, याचे भान विरोधकांनी ठेवावे. सरपंच नारळ फोडू लागले तर आमदार, खासदारांनी घरी बसायचे काय? तालुक्यात यापूर्वी कधी घडला नाही असा वाईट प्रकार सध्या विरोधकांनी सुरू केला आहे. ज्यांनी कामे मंजूर केली, त्यांनाच त्यांचे श्रेय घेऊ द्या. ​जिरेवाडी येथील सभामंडपाचे काम ​पूर्वी पंचवीस-पंधरा या योजनेतून ​मंजूर झाले होते. मात्र, राज्यात सरकार बदलले अन् काम रद्द झाले. जनतेला दिलेला शब्द पाळणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते. त्यामुळे आमदार निधीतून सभामंडप देऊन​ मी शब्द पाळ​ला, असे त्यांनी सांगितले.

संतोष आंधळे यांनी प्रास्तविक केले. धनश्री शिरसाट यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT