Satara, 18 October : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी सातारा जिल्हा दौऱ्यावर असूनही शनिवारी (ता. १७ ऑक्टोबर) शिवसेना नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेणे टाळले होते. मात्र, डॉ. जाधव यांनी आज शंभूराज देसाई यांची भेट घेऊन पाठिंब्याबाबत चर्चा केली. मात्र, देसाई यांनी पाठिंब्याबाबत पक्षश्रेष्ठी आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रमाकडे बोट दाखवत भाजपला गॅसवर ठेवले आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेने उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी राहिलेले अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्यासाठी पाचही जिल्ह्यातील नेत्यांना कामाला लावले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या प्रमाणात धूसफूस असल्याचे समोर आले आहे.
एकीकडे शिक्षक मतदारसंघात महायुतीमधील शिवसेना आणि भाजप अंतर्गत वाद असताना पदवीधरमध्ये धूसफूस असल्याचे दिसून येत आहे. कारण शनिवारी महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव ह्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. त्या दौऱ्यात त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्य नेत्यांची भेट घेतली होती. मात्र, शिवसेना नेते शंभूराज देसाई यांची भेट टाळली होती. त्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात झाली होती.
डॉ. स्मिता जाधव यांच्या दौऱ्यात शंभूराज देसाई यांच्या भेटीचा उल्लेख झाला होता. मात्र, प्रत्यक्ष भेट टाळली होती. शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेनेने दिलेल्या पाठिंब्यानंतर आता पदवीधर मतदारसंघात ही महायुतीत धुसफुस सुरू झाली आहे.
दरम्यान, डॉ. स्मिता जाधव यांनी आज शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांनी पाठिंबा देण्याची विनंती केली. या भेटीनंतर शंभूराज देसाई म्हणाले, डॉ स्मिता जाधव यांनी माझी भेट घेतली. त्यांनी पाठिंबा देण्याची विनंती केली. त्यांना मी सांगितले की, आम्ही महायुतीमध्येच आहोत. पण यापूर्वी जिल्ह्यात काही बाबी घडलेल्या आहेत.
आम्ही नेतेमंडळी नाही. पण, कार्यकर्त्यांमध्ये थोडीशी नाराजी आहे. वरिष्ठ पातळीवर त्या गोष्टी एकदा क्लिअर झाल्या की अडचण कुठली येणार नाही. त्या लवकर दूर झाल्या तर शिवसेनेचा एक मेळावा घेऊन पक्षाचा पाठिंबाही त्यांना जाहीर करू, असे देसाई यांनी जाहीर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.