Barshi News : बार्शीवर माझं जरा जास्तच प्रेम आहे; बार्शीही राऊतांइतकेच माझ्यावर प्रेम करते : जयकुमार गोरेंचा दावा

Jaykumar Gore Statement : बार्शीवर विशेष प्रेम असल्याचे सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राजेंद्र राऊत यांच्या विधानसभा पराभवानंतर विकासकामे थांबल्याचे म्हटले. विधान परिषद निवडणुकीतील त्यांच्या विजयानंतर बार्शीला पाणी मिळाल्याचा दावा गोरे यांनी केला.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSarkarnama
Published on: 
Updated on: 

Solapur, 18 October : बार्शीवर माझं जरा जास्तच प्रेम आहे, जेवढं प्रेम बार्शी राजाभाऊंवर करते, तेवढं माझ्यावरही करते. एक चूक झाली, राजेंद्र राऊत यांचा विधानसभेला पराभव झाला आणि सर्व कामं थांबली. पण विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजेंद्र राऊत निवडून आले आणि बार्शीला पाणी आले, असे विधान पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ बार्शीत मेळावा झाला. त्या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री गोरे यांनी राजेंद्र राऊतांचा पराभवावर भाष्य केले.

ते म्हणाले, राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेत निवडून दिल्यानंतर बार्शीला पाणी आले. आता आपण पदवीधरला भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विचारांचा उमेदवार निवडून दिला तर पदवीधरांना न्याय मिळेल. देवाभाऊ ज्यांच्या पाठीशी उभे आहेत, तिथल्या प्रश्नांना कधी अडचण येत नाही.

अगदी पोलीस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेविका यांचे प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी सोडवलेले आहेत, त्यामुळे पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्या उमेदवाराला निवडून देणे गरजेचं आहे, असेही गोरे यांनी नमूद केले.

Jaykumar Gore
Solapur Politic's : ‘पुणे शिक्षक-पदवीधर’मध्ये मोठी राजकीय घडामोड : पवारांच्या आमदाराची भाजपच्या मेळाव्याला हजेरी; चर्चांना उधाण

ते म्हणाले, विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. कौस्तुभ गावडे यांच्या कुटुंबाला शैक्षणिक संस्थेचा वारसा आहे. अनेक कुटुंबाचे घरसंसार उभे करणे आणि सर्वोच्च शिक्षण देण्याचं काम केलं आहे.

आंदोलन उभं करणं म्हणजे प्रश्न सोडविणं, असं होत नाही. मात्र, आंदोलन करणाऱ्यांनाही न्याय दिला. मंत्री असे आहेत की, प्रश्नच कळत नाहीत. मात्र, चंद्रकांत पाटील यांना शिक्षण क्षेत्रातील सर्व प्रश्न कळतात. शिक्षक मतदारसंघात कोणाचं काहीही मत असलं तरी विजय हा कौस्तुभ गावडे यांचाच होणार आहे, असा दावाही गोरे यांनी केला.

Jaykumar Gore
Satara Dcc Bank Election : 10 वर्षांच्या नियमांचा दिग्गजांना दणका : सातारा जिल्हा बॅंकेसाठी अशा रंगणार लढती...

ते म्हणाले, राजेंद्र राऊत यांनी आज सकाळपासून खूप चांगल्या बैठका केल्या. जवळजवळ 80 टक्के पदवीधर आणि 70 ते 75 टक्के शिक्षकांचे मतदान आपल्या बाजूने होत आहे. आमच्या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा. मत कसं द्यायचं, हे मी सांगण्यापेक्षा पदवीधरमध्ये ज्यांनी आमदार म्हणून काम केलं ते चंद्रकांतदादा सांगतील, असे म्हणून मतदान प्रक्रिया राबविण्याच्या पद्धतीची माहिती देण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर सोपवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com