Satyajeet tambe, Sudhir tambe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Congress : डॉ. सुधीर तांबे यांच्यानंतर सत्यजीत तांबे यांच्यावरही निलंबनाची टांगती तलवार

Sudhir Tambe : येत्या 18 जानेवारीला सत्यजीत तांबे भूमिका स्पष्ट करणार

सरकारनामा ब्यूरो

Congress : काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्यामुळे डॉ. सुधीर तांबे यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली. नाशिक पदवीधर मतदारसंघात सुधीर तांबेंना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी देऊन देखील त्यांनी उमेदवारी अर्ज न भरल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

डॉ. सुधीर तांबे यांच्यानंतर सत्यजीत तांबे यांच्यावरही पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. कारण सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने त्यांच्यावरही पक्षाकडून निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर याबाबत सत्यजीत तांबे हे त्यांची सविस्तर भूमिका येत्या 18 तारखेला स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आता ते नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कारवाईनंतर सुधीर तांबे नेमकं काय म्हणाले?

''आम्ही येत्या 18 जानेवारीला भूमिका स्पष्ट करणार आहोत. आता या कारवाईवर काहीच बोलणार नाही. सध्या आम्ही निवडणूक प्रचारात व्यस्त आहोत. आमची भूमिका आम्ही मांडणार पण योग्य वेळी'', असं त्यांनी स्पष्ट केलं.

डॉ. सुधीर तांबे यांच ट्विट काय आहे?

''माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे, असे ट्वीट सुधीर तांबे यांनी केले आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. तर त्यांचे चिंरजीव सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. याच कारणावरून डॉ. सुधीर तांबे यांच्या चौकशीचे आदेश काँग्रेस हायकमांडकडून देण्यात आले आहेत.

आता सत्यजीत तांबे यांच्यावर देखील पक्ष कारवाई करण्याची शक्यता आहे. दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. तर येत्या 18 जानेवारीला तांबे नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT