Sudhir Tambe : निलंबनाच्या कारवाईनंतर सुधीर तांबेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Sudhir Tambe : पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्यामुळे सुधीर तांबे यांच्यावर शिस्तभगांची कारवाई
Dr. Sudhir Tambe
Dr. Sudhir TambeSarkarnama
Published on
Updated on

Sudhir Tambe : काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्यामुळे शिस्तभगांची कारवाई तांबे यांच्यावर करण्यात आली आहे. तर या कारवाईबाबत सध्या काहीच बोलणार नसल्याचे सुधीर तांबे यांनी सांगितले आहे.

काँग्रेसकडून करण्यात आलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर डॉ. सुधीर तांबे हे माध्यमांशी बोलताना म्हणाले, ''पक्षाने चौकशी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे ही चौकशी होईपर्यंत मी काहीही बोलणार नाही. बाकी ज्या चर्चा सुरू आहेत. त्या सर्व निरर्थक आहेत. आता यावर काहीच बोलणार नाही. सध्या आम्ही निवडणूक (election) प्रचारात व्यस्त आहोत. आमची भूमिका योग्य वेळी मांडणार आहोत'', असं म्हणत या विषयावर सविस्तर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

डॉ. सुधीर तांबे यांच ट्विट काय आहे?

''माझ्या संदर्भाने काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका ही न्यायाला धरून नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. चौकशीअंती सत्य समोर येईल. न्यायावर माझा विश्वास आहे'', असं स्पष्टीकरण त्यांनी ट्विटरद्वारे दिलं आहे.

काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्यामुळे शिस्तभगांची कारवाई त्यांच्यावर करण्यात आली आहे. सुधीर तांबेंची चौकशी होईपर्यंत त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Dr. Sudhir Tambe
Ajit Pawar News : "थोडक्यात वाचलो, नाहीतर आज मला श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती"

डॉ. सुधीर तांबे यांच्या चौकशीचे आदेश काँग्रेस हायकमांडकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे डॉ. सुधीर तांबे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सुधीर तांबे यांची नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारीची अधिकृत घोषणा झाली होती.

मात्र, त्यानंतर देखील त्यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. तर त्यांचे चिंरजीव सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती.

Dr. Sudhir Tambe
Solapur : सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाची राजकारणात एन्ट्री?

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची काँग्रेसच्या (Congress) हायकमांडने दखल घेतली असून सुधीर तांबे यांचे निलंबन करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुधीर तांबे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच त्यांनी पक्षाने केलेल्या कारवाईबाबत आत्ता काहीही बोलणार नाही, असं सांगितलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com