Dr. Sujay Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dr. Sujay Vikhe Patil : अन्यथा मते मागायला येणार नाही

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या बन्नोमाँ यात्रेनिमित्त दर्ग्यात चादर आर्पण केल्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) बोलत होते.

सरकारनामा ब्युरो

उद्धव देशमुख

Dr. Sujay Vikhe Patil : महाविकास आघाडी सरकारने भाजपाचे लोकप्रतिनिधी असलेल्या ठिकाणी सूडबुद्धीने त्यांच्या कार्यकाळात विकासासाठी भरीव निधी दिला नाही. आताचे सरकार हे शेतकरी तसेच सर्वसामान्यांच्या हिताचे असल्याने शेवगाव तालुक्यातील राज्यमार्ग व प्रमुख रस्त्याचे कामे प्राधान्याने हाती घेऊन दोन वर्षात पूर्ण करू, अन्यथा पुन्हा मते मागायला येणार नसल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांनी सांगितले. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या बन्नोमाँ यात्रेनिमित्त दर्ग्यात चादर आर्पण केल्यानंतर ते बोलत होते.

देवस्थानतर्फे विखे यांचा यात्रा पंचकमिटीचे अध्यक्ष कुंडलिक घोरतळे यांनी सत्कार केला. यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे, नितीन काकडे, सुभाष पवळे, सदा गायकवाड, मयूर हुंडेकरी, महादेव घोरतळे, माजी सरपंच अभय चव्हाण, संजय खेडकर, प्रकाश गर्जे, प्रांताधिकारी देवदत्त केकान, शेवगावचे तहसीलदार छगन वाघ उपस्थित होते.

विखे म्हणाले की, श्री साध्वी बन्नोमाँ देवस्थानचा तीर्थक्षेत्र ‘ब’ वर्गात समावेश होण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करू. शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्काच्या सातबारा उताऱ्यावर तलाठ्याने चुकीच्या नोंदी केल्या आहेत. त्या बदलण्यासाठी जो भ्रष्टाचार होत आहे, तो बंद करून भ्रष्टाचार मुक्त महसूल विभाग करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवरस्ते, ओढे-नाले वर अतिक्रमण झाले आहे, त्याची तीन महिन्यात शासन व खासगी यंत्रणेसमार्फत मोजणी करून हद्द निच्छित करून खुले करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय हाती घेतला जाईल.

शिवसेनेची वाट लावली

राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेशिवाय करमत नाही. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांवर भरवसा ठेवला आणि त्यांनी शिवसेनेची वाट लावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT