Dropadi Murmu In Maharashtra : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Draupadi Murmu In Maharashtra : द्रौपदी मुर्मु आज शिर्डीत; साई दर्शनासाठी येणाऱ्या देशाच्या पाचव्या राष्ट्रपती !

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) आज (7 जुलै) शिर्डीमध्ये श्री साई समाधी दर्शनासाठी येत आहेत. त्यांच्या सोबत राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) असणार आहेत. राष्ट्रपती मुर्मु शिर्डीत येत असल्याने शिर्डी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. शिर्डीला भेट देणाऱ्या त्या देशाच्या पाचव्या राष्ट्रपती असणार आहेत. (Latest Marathui News)

सकाळी 11 वाजता राष्ट्रपती मुर्मु आणि राज्यपाल बैस यांचे मुंबईतून विमानाने शिर्डी विमानतळाकडे प्रयाण होणार आहे. दुपारी 12 वाजता काकडी (ता. कोपरगाव) विमानतळावर त्यांचे आगमन होईल. दुपारी 12.25 वाजता राष्ट्रपती श्री साईबाबा मंदिर येथे आगमन होईल.

दुपारी 12.35 ते 1.20 वाजेच्या दरम्यान त्या श्री साईबाबा मंदिर येथे आरती व दर्शनास उपस्थिती राहतील. त्यानंतर राष्ट्रपती मंदिर आवारातील वस्तू संग्रहालयाला भेट देतील. साईबाबांनी आपल्या हयातीत वापरात असलेल्या विविध वस्तू या संग्रहालयात आहेत. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मु आणि राज्यपाल बैस साई प्रसादालयात भोजन घेतील. त्यानंतर दुपारी 3 वाजता राष्ट्रपती आणि राज्यपाल हे काकडी विमानतळावरून मुंबईला रवाना होतील.

राष्ट्रपती आज ( ता. 7) शिर्डीत श्री साई समाधी दर्शनानिमित्ताने उपस्थित असल्याने पोलीस-प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती नाशिक पोलीस क्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर यांनी दिली आहे. 7 पोलीस अधीक्षक, 170 पोलीस अधिकारी आणि 1100 पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांची सर्व घडामोडींवर लक्ष असणार आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी शिर्डीच्या साई समाधी मंदिरात दर्शनासाठी देशाच्या चार राष्ट्रपतींनी शिर्डीमध्ये येत साई समाधीचे दर्शन घेऊ, मनोभावे पूजा केलेली आहे. यामध्ये 1997 च्या दरम्यान राष्ट्रपती असलेले शंकर दयाळ शर्मा, त्यानंतर 2007 मध्ये प्रतिभाताई पाटील, त्यानंतर 2013 मध्ये प्रणव मुखर्जी आणि 2017 मध्ये रामनाथ कोविंद या राष्ट्रपतींनी शिर्डीमध्ये साईंच्या दरबारात हजेरी लावत साई समाधीचे आशीर्वाद घेतले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT