Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना अधिक वेग आले आहे. आगामी निवडणुकांची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सर्वच पक्षांची लगबग सुरू झाले आहे. आता खुद्द राज्य निवडणूक आयोगानेच एकप्रकारे निवडणूक लागण्याचे संकेतच दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्या लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)
मागील अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या रखडले गेले होते. राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रामध्ये या निवडणुकीचा उल्लेख केला गेला आहे. यामुळे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडण्याची चिन्हे दिसत आहेत.
निवडणूक आयोगाचे मोठे संकेत -
या वर्षाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकींचा उल्लेख राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रातमध्ये नमूद करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका यासाठी मतदार याद्या अंतिम करण्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल, असा उल्लेखही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.