Dilip Mane-Siddheshwar Avtade-Baliram Sathe
Dilip Mane-Siddheshwar Avtade-Baliram Sathe sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

दूध पंढरीचा आखाडा : दिलीप माने, बळीराम साठे, आवतडेंना धक्का; २६ जणांचे अर्ज बाद!

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : दूध पंढरीच्या (सोलापूर जिल्हा दूध संघ) राजकीय आखाड्यातून माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (baliram sathe), विद्यमान संचालक दीपक माळी, प्रभाकर कोरे, युवा नेते सिद्धेश्वर आवताडे या दिग्गजांसह तब्बल २६ जणांचे अर्ज छाननीत अवैध ठरले आहेत. दरम्यान, अर्ज बाद झालेल्यांना तीन दिवसांत अपिल करता येणार आहे. (Dudh Sangh Election: Applications of 26 veterans including Dilip Mane,Baliram Sathe rejected)

माने, साठे, आवताडे यांच्याबरोबरच मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, ज्येष्ठ नेते गोपाळराव कोरे यांना धक्का मानला जात आहे. कारण माने, साठे, आवताडे हे स्वतः उमेदवार होते. मात्र, पाटील यांचे कट्टर समर्थक मसले चौधरीचे माजी सरपंच हणमंत पोटरे, तसेच कोरे यांचे चिरंजीव प्रभाकर यांचेही अर्ज बाद झाले आहेत.

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघांच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी क्रियाशील संस्था सभासद मतदारासंघासाठी ६४ अर्ज आले होते, त्यापैकी २१ अर्ज अवैध ठरले आहेत. या मतदारसंघासाठी ४३ अर्ज वैध ठरले आहेत.

महिला प्रतिनिधी मतदारसंघासाठी ३४ अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी दोन अर्ज नामंजूर झाले असून ३२ अर्ज मंजूर झाले आहेत. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघासाठी पाच अर्ज होते, त्यापैकी एक अर्ज नामंजूर झाला असून चार अर्ज मंजूर झाले. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदारासंघासाठी तेरा अर्ज आले होते, त्यापैकी एक अर्ज बाद झाला असून १० अर्ज वैध ठरले आहेत. भटक्‍या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीसाठी सतरा अर्ज आले होते. एक अर्ज नामंजूर ठरला, त्यामुळे पंधरा अर्ज वैध ठरले आहेत. एकूण १३३ जणांपैकी २६ अर्ज अवैध ठरले आहेत.

दरम्यान, ज्यांचे अर्ज बाद झाले आहेत, त्यांना येत्या तीन दिवसांत पुण्याच्या उपविभागीय उपनिबंधक (डेअरी) यांच्याकडे अपिल करू शकतात, त्यात ते पात्र ठरल्यास ते निवडणूक लढवू शकतात, असे निवडणूक निर्णय अधिकरी कुंदन भोळे यांनी सांगितले.

यांचे अर्ज झाले बाद

नारायण गुंड, अलका बंडगर, विकास गलांडे, हणमंत पोटरे, दीपक माळी, दाजी दोलतडे, सिद्धेश्वर आवताडे (दोन अर्ज), बळीराम साठे, संतोष वावरे, रेवती साखरे (दोन अर्ज), दिलीप माने (दोन अर्ज), प्रभाकर कोरे, ललिता लवटे, सरस्वती भोसले, कौशल्या नवले, संताजी पाटील, तायाप्पा गरंडे, संगीता लोंढे, पांडुरंग भाकरे, विजय गुंड, मीराबाई कसबे, भीमराव कोकरे, शहाजी पाटील.

क्रियाशील संस्था मतदारसंघातील पात्र उमेदवार (सभासद)

मोटे नीता नारायण, सुरवसे उत्तरेश्वर जयसिंग, जाधव सविता विलास, चौगुले अलका गोरख, शेंबडे वैशाली संतोष, पाटील सारिका बाळासाहेब, येलपल्ले विजय बाबुराव, वाडदेकर औदुंबर नारायण, अवताडे अनिल उत्तम, धावणे बबनराव बाबुराव, माने वैष्णवी विजय, राजेभोसले राजेंद्रसिंह शंकरराव, पाटील लक्ष्मीकांत शिवाजी, सोपल योगेश सुधीर, पाटील माधुरी बाळासाहेब, मुंडे वालचंद गणपत, इंगळे सुवर्णा विठ्ठल, शिंदे सुनिता बापू, माने संभाजी काशिनाथ, लवटे मारुती भीमराव, मोरे संभाजी भालचंद्र, शिंदे रणजजितसिंह बबनराव, गरड मनोज ज्ञानदेव, घाटगे कांचन उत्कर्ष, चौगुले उषा भगवान, पाटील पार्वतीबाई चंद्रकांत, माळी बाळासाहेब महादेव, मोरे राजेंद्र कृष्णात.

उत्तर सोलापूर, मोहोळमधील १५ अर्ज बाद

उत्तर सोलापूर तालुक्यातील आठ, तर मोहोळ तालुक्‍यातील सात अर्ज छाननीत बाद झाले आहेत. त्यानंतर मंगळवेढ्यातील पाच, करमाळा आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील प्रत्येकी दोन अर्ज अवैध ठरले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT