Satyajitsinh Patankar
Satyajitsinh Patankar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Patan : मुंबईकर शेठजींमुळे निवडणुकांत पैशांचा तमाशा... सत्यजितसिंह पाटणकर

राजेश पाटील

Patan News : पाटण तालुक्यातील निवडणुकात वेगळाच आणि लोकशाहीला घातक असा पायंडा पडतो आहे. निवडणुका लागल्या की मुंबईवरून शेठजी गावाकडे येतात आणि पैशाचा तमाशा होतो. तालुक्यात खऱ्या अर्थाने काहीतरी चांगले घडवायचे असेल तर विकासाची तळमळ असलेली चांगली माणसे सत्तेत आणा',असे आवाहन राष्ट्रवादीचे NCP युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर Satyajitsinh Patankar यांनी केले आहे.

जानुगडेवाडी (ता.पाटण) गावचे सुपुत्र ॲड. अविनाश जानुगडे यांची पाटण तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा तसेच तेथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे नूतन अध्यक्ष अमर जानुगडे, उपाध्यक्ष राजाराम सावंत व अन्य संचालकांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले,' पाटण तालुक्यात सद्यस्थितीला टक्केवारी शिवाय दुसरा उद्योगच उरलेला नाही. एकाच रस्त्यावर दोन-तीन वेळा निधी टाकला जात आहे. ऊसाच्याच बाबतीत बोलायचे झाले तर तुमच्यासारखी आमचीही गत झाली आहे. मात्र, काळजी करू नका लवकरच आपलाही कारखाना सुरू होणार आहे.

सद्या राजकारणात केव्हा काय घडामोड घडेल आणि कुणाची कुणाबरोबर युती होईल हे सांगता येत नाही. मात्र, वर काहीही घडूद्यात, आपण सर्वांनी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी दिलेल्या विकासाच्या विचाराच्या मार्गावरून चालायचे आहे. लोक विसरून जातात म्हणून पाटणकरांनी तालुक्यात केलेल्या प्रचंड विकासाची वेळोवेळी उजळणी होणेही गरजेचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT