Satara : रम्मी खेळण्यासाठी तो चक्क बॅटऱ्या चोरायचा; पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

MIDC Satara सातारा येथील एमआयडीसी महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोड, पेट्रोलपंप अशा ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला जात होत्या.
karad Crime
karad Crimesarkarnama
Published on
Updated on

Satara News : ऑनलाईन रम्मी Online Rummy खेळण्याची सवय लागल्याने पैसे संपू लागले. पैसे नसल्याने कराडातील एका युवकाने शक्कल लढवली व त्याने चारचाकी गाड्यातील बॅटऱ्या चोरण्याचा निर्णय घेतला. दररोज बॅटऱ्या चोरु लागला व त्या विकून त्यातून मिळणाऱ्या पैशातून ऑनलाईन रम्मी खेळायचा. अखेर सातारा पोलिसांनी Satara Police त्याचा मुस्क्या आवळल्या. सुजित दिनकर झुंजार (वय 27, रा. कोपर्डे, ता. कराड) असे संबंधितांचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे चार लाख सात हजार रूपयांच्या बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा येथील एमआयडीसी महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोड, पेट्रोलपंप अशा ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनांच्या बॅटरी अज्ञात चोरट्यांकडून चोरी केल्या जात होत्या. याबाबत सातारा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, पोलीसांकडूनच रात्रीच्यावेळी या ठिकाणी पेट्रोलिंग केले जात होते. त्यावेळी त्यांना एक संशयित व्यक्ती आढळून आला.

त्यास पोलीसांनी ताब्यात घेवून त्याची कसून चौकशी केली असता त्याने सातारा शहरातून विविध ठिकाणी असलेल्या ट्रक, टॅम्पो, जेसीबी मशीन अशा वाहनाच्या एकूण ३६ बॅटऱ्या चोरी केल्याचे सांगितले. तसेच अधिक चौकशी केली असता त्याने ऑनलाईन रम्मी खेळण्याची सवय लागल्याने व त्यामध्ये खेळण्यासाठी पैसे लागत होते. म्हणून बॅटरी चोरी करून त्याची विक्री करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपण रम्मी खेळत असल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

karad Crime
Satara : मेडिकल कॉलेजच्या भंगार चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली मोटारसायकल, मोबाईल, बॅटऱ्या असा एकूण ४ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, ज्या वाहनधारकांच्या मागील २-३ महिन्यापूर्वी बॅटऱ्या चोरी झालेल्या आहेत. त्यांनी सातारा शहर पोलीस ठाणेशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.

karad Crime
Mumbai Police : प्रजासत्ताकदिनी मुंबईतील दोन हजार ९०० जणांना बढतीची भेट

ही कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक रापू संगर, पोलीस उपअधिक्षक मोहन शिंदे, पोलीस निरीक्षक भगवान किर, श्रीमती वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो. ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज खाणे, अमय साबळे, विक्रम माने, विकास शिंदे, रोहित बाजारे, संतोष कचरे, गणेश मोंग सागर गायकवाड, गणेश घाडगे, विशाल धुमाळ यांनी केलेली आहे.

karad Crime
Phaltan : भांडायच्यावेळी तुटेपर्यंत भांडू; पण, विकासासाठी एकत्र राहू...रामराजे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com