Kolhapur News : राष्ट्रवादीचे बडे नेते व आमदार हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांच्यावर ईडीची कारवाई पुन्हा सुरू करण्यात झाली आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेत आता (Kolhapur District) ईडीने (ED) झाडाझडती घेतली आहे. यामुळे आता कोल्हापूरचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.
मागील २० तासांपासून ईडीकडून झाडाझडती सुरू आहे. यापूर्वीच मुश्रीफांच्या घरी धाड टाकण्यात आली होती. याच अनुषंगाने आता जिल्हा बँकेची ईडीने तपास सुरू केला आहे. ईडीच्या अधिकाऱ्याकडून भोगावती तसेच, बिद्री साखर कारखाना एमडी यांना ही या प्रकरणात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.
आता पुन्हा कोल्हापूरमध्ये ईडीने विविध ठिकाणी धाड टाकली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य कार्यालय, कागल तालुक्यामधील जिल्हा बँकेची शाखा, याप्रमाणेच गडहिंग्लज तालुका हरळी येथील 'गोडसाखर'ला संबंधित जिल्हा बँकेच्या शाखांवर धाडी टाकण्यात आले आहेत.
मागील अनेक दिवसांपासून होत असलेल्या आरोपांमुळे मुश्रीफ ईडीच्या निशाण्यावर आहेत. मात्र 21 दिवसांनंतरही धाडीचा कसलाही तपशील ईडीकडून अजूनही सादर करण्यात आलेला नाही. पण यानंतर ही पुन्हा ईडीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा बँकेतून ईडीने पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहेत.
हसन मुश्रीफ यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप, विरोधकांनी आरोप केला होता. मागील महिन्यात 11 जानेवारी दरम्यान पडलेल्या धाडीत भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूरमध्ये येऊन मुश्रीफांवर आरोप केले होते. मुश्रीफांनी 158 कोटी घोटाळ्याचा आरोप केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.