Marathwada Teacher Constituency Result : राष्ट्रवादीच्या विक्रम काळेंची विजयासाठी झुंज

Aurangabad Politics : थोड्याच वेळात कुणाचा विजय होणार हे समोर येणार
Vikram Kale
Vikram Kale Sarkarnama
Published on
Updated on

Aurangabad : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या एकूण पाच जागांच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येत आहे. यातच औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अधिक रंगत पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे विक्रम काळे हे विजयासाठी संघर्ष करत आहेत. मात्र, थोड्याच वेळात कुणाचा विजय होणार? हे समोर येणार आहे.

Vikram Kale
Nashik Graduate Election Result : सत्यजीत तांबेंना थोरातांचा पाठिंबा? पोस्टरमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या

औरंगाबाद (Aurangabad) विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांनी पहिल्या पसंतीची २० हजार ७८ मते घेऊन आघाडी मिळवली आहे. तर दुसऱ्या स्थानावर शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव यांना पहिल्या पसंतीची १३ हजार ५४३ मते मिळाली आहेत. तसेच तिसऱ्या स्थानावर भाजपचे किरण पाटील असून त्यांना १३ हजार ४८९ पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत.

Vikram Kale
Nashik Graduate Election : पहिल्या फेरीत सत्यजीत तांबेंना मोठी आघाडी...

दरम्यान, ५३ हजार २५७ शिक्षकांनी मतदान केले होते. त्यापैकी २ हजार ४८५ मते बाद झाली आहेत. तर ५० हजार ७७१ मते वैध ठरली आहेत. त्यामुळे विजयासाठी २५ हजार ३८६ मतांचा कोटा ठरवण्यात आला. आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात येत आहे. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मोजणीनंतरच विजयी कोण होणार हे स्पष्ट होणार आहे.

Vikram Kale
Nagpur Constituency Election Result : सुधाकर अडबालेंनी गाणारांना रोखले, भाजपला मोठा धक्का...

विक्रम काळे (Vikram Kale) हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असून त्यांना महाविकास आघाडीतील पक्षांचा पाठिंबा आहे. त्यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीने मोठी ताकद लावली होती. तर शेवटच्या क्षणी विजयासाठी विक्रम काळे हे संघर्ष करत असून थेड्याच वेळात कोणाचा विजय होणार हे स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com