Kolhapur News : कालपर्यंत विरोधकांच्या पक्षातील नेत्याच्या घरी ईडी छापा पडल्याचे अनेक उदाहरण पहायला मिळाली आहेत. पण आता कोल्हापुरात इडीकडून भाजपच्याच नेत्याच्या घरावरच धाड टाकण्यात आली आहे. तब्बल 15 तास चौकशी केल्यानंतर संबंधितास मुंबईला हजर राहण्याचे आदेश देवून हे पथक निघून गेले. यामुळे आता परिसरासह कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हुपरी येथील महावीरनगरमधील चांदी व्यावसायिक आणि भाजपचे माजी नगराध्यक्ष भारत लठ्ठे यांच्याच घरावर आणि कार्यालयावर इडीकडून छापेरमारी करण्यात आली. पहाटे चारच्या सुमारास पडलेल्या धाडीमुळे घरातील सदस्य घाबरले होते. आवेळी लठ्ठे यांची सुमारे पंधरा तास चौकशी सुरू होती.
चौकशीदरम्यान कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त होता. शुक्रवारी पहाटेपासूनच हे पथक चौकशीसाठी हुपरीत दाखल झाले होते. पहाटे चारच्या सुमारा लठ्ठे यांच्या घरात प्रवेश करत चौकशी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कुटुंबियांची तारांबळ उडाली.
दरम्यान या संपूर्ण प्रकाराची माहिती हळूहळू गावात पसरल्यानंतर बघ्यांची गर्दी होती. मात्र त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चौकशीच्या ठिकाणी कोणालाही फिरकू दिले जात नव्हते. अत्यंत गोपनीय पद्धतीने चौकशी झाली. कारवाईत काय निष्पन्न झाले याबाबतचा अधिकृत तपशील मिळू शकलेला नाही. ईडीच्या पथकात सहा अधिकाऱ्यांचा सहभाग होता. या अधिकाऱ्यांनी पहाटे चारलाच निधी बँक कार्यालयाचा ताबा घेतला.
बँकिंग, शेअर बाजार तसेच अन्य व्यवहाराच्या कागदपत्रांची तपासणी केल्याचे समजते. रात्री सातला चौकशी पूर्ण करून अधिकारी बाहेर पडले. छापा पडलेली व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे. शहरात याआधी आयकर विभागाचे छापे पडल्याच्या घटना घडल्या. पण, ईडीसारख्या चौकशी यंत्रणेचा छापा प्रथमच पडल्याने त्याची शहर परिसरात जोरदार चर्चा सुरू होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.