
ED Raids Target Jewellery Sector in Nagpur : नागपूर शहरातील सराफा व्यापारी आणि एका हवाला व्यापाऱ्याच्या घरावर EDच्या पथकाने छापे टाकले. त्यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशातील रायपूरवरून आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. सध्या दोघांच्याही घराची झाडाझडती सुरू असून ईडीच्या हाती मोठे घबाड लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
EDने धाड टाकलेले पुरुषोत्तम कावळे हे प्रसिद्ध सराफा व्यापारी आहेत. विदर्भासह संपूर्ण भारतातील सराफांना ते दागिण्यांचा पुरवठा करतात. यापूर्वी नागपूरमध्ये येणाऱ्या एका रेल्वेतून पोलिसांनी १८ कोटींचे सोने जप्त केले होते. ते कावळे यांचे असल्याचे तपासात समोर झाले होते. त्यामुळे कावळे यांना तुरुंगात मुक्काम करावा लागला होता.
मात्र तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर कावळे यांनी पुन्हा आपला व्यवसाह जोमात सुरू केला होता. त्यांच्या सर्व हालचाली आणि व्यवहारावर पोलिसांचा वॉच आधिपासूनच होता असे समजते. कावळेचे नेटवर्क आणि देशभरातील सराफा व्यापाऱ्यांशी संबंध बघता त्यांच्या गैरव्यवहारात अनेकजण सामील असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कावळे यांच्या इतवारी येथील सागर ज्वेलर्स आणि एम्प्रेस सिटी येथील घरावर छापे टाकण्यात आले आहेत. कावळे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून विचारपूस केली जात आहे. त्यांच्या सर्व आर्थिक व्यवहाराची कडक तपासणी केली जात आहे. मात्र या कारवाईत काय काय जप्त केले याचा तपशील अद्याप बाहेर आलेला नाही.
शैलेश लखोटिया हा हवालाचा व्यवसाय करतो. त्याचे शहरातील जवळपास सर्वच व्यापाऱ्यांशी संबंध आहेत. त्याच्या वर्धमान नगरातील घराची सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांमार्फत झाडाझडती घेतल्या जात आहे. हवाला व्यवहारासोबत तो ऑनलाइन सट्टेबाजी करत असल्याची चर्चा आहे. २००७-०८ मध्ये एका दरोड्यात शैलेश लखोटियाच्या दोन भावांची हत्या झाली होती.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.