Basavraj Bommai-Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra-Karnataka : सीमाप्रश्न पेटला; सोलापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. ८ डिसेंबर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळला होता.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : महाराष्ट्र (Maharashtra)-कर्नाटक (Karnataka) सीमाप्रश्न सोलापुरात (Solapur) चांगलाच पेटला आहे. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील काही गावांवर दावा सांगणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांचा पुतळ्याचे सोलापूर शहरात दहन करण्यात आले. बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट Ekanth Shinde) पक्षाच्या युवा सेनेकडून शुक्रवारी (ता. ९ डिसेंबर) बोम्मई यांचा निषेध करण्यात आला. (Effigy of Karnataka Chief Minister burnt in Solapur)

गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्ये येत आहेत. तसेच, चार दिवसांपूर्वी कर्नाटका महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. तसेच, कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता. ८ डिसेंबर) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळला होता. त्याला उत्तर म्हणून आज सोलापुरात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळण्यात आला.

कर्नाटकमध्ये गुरुवारी कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आज सोलापुरात मुख्यमंत्री शिंदे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळण्यात आला.

युवा सेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख सागर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मराठी माणसांवर होणारा अन्याय थांबवा; अन्यथा कर्नाटकमध्ये येऊन तुमचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाण्यात येईल, असा इशारा शिंदे गटाच्या युवा सेनेकडून कर्नाटक सरकारला देण्यात आला.

दरम्यान, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना याबाबतची माहिती दिली आहे. याशिवाय भाजप आणि शिंदे गटाचे खासदारही शहा यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT