Rebels Defeated the BJP: बंडखोरांनी केला भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ : पक्षाच्या १४ उमेदवारांचा घडविला पराभव!

Himachal Pradesh Election: अनेक मतदारसंघामध्ये भाजपने बंडखोरांना हलक्यात घेतले, त्यामुळेच जयराम ठाकूर सरकारचे आठ मंत्री या निवडणुकीत पराभूत झाले आहेत.
Himachal Pradesh Assembly Election
Himachal Pradesh Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

चंदीगड : हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) भारतीय जनता पक्षाचा (BJP) बंडखोरांनीच (rebel) करेक्ट कार्यक्रम केल्याचे मतमोजणीतून पुढे आले आहे. भाजपने तब्बल ११ आमदारांची तिकिटे कापली होती, त्यामुळे भाजपच्या २१ नेत्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली होती, त्यातील १४ जणांनी भाजप उमेदवारांचा पराभव (defeat) करत सत्ता घालविण्यास हातभार लावला आहे. हिमाचलमधील बंडखोरी मोडून काढण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डापासून (JP Nadda) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) प्रयत्न केले हेाते. मात्र, त्यानंतरही बंडखोरी कायम राहिली आणि भाजपची हिमाचलमधील सत्ता गेली. (In Himachal Pradesh, the rebels defeated the BJP in 14 seats)

फतेहपूरमध्ये माजी खासदार किरपाल परमार यांना खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आल्याची चर्चा होती. त्याचा एक कथित व्हिडिओही व्हायरल झाला होता. अनेक मतदारसंघामध्ये भाजपने बंडखोरांना हलक्यात घेतले, त्यामुळेच जयराम ठाकूर सरकारचे आठ मंत्री या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. मात्र, भाजपविरोधात बंडखोरी करूनही भाजपच्या बंडखोरांनी नालागढ, देहरा आणि हमीरपूरमध्ये हे तीन मतदारसंघ जिंकले आहेत. काँग्रेसच्या बंडखोरांनीही पक्षाचे काही जागांवर नुकसान केले आहे.

Himachal Pradesh Assembly Election
सोलापुरात ठाकरेंना धक्का : माजी मंत्री दिलीप सोपलांचा शिवसेनेचे पद स्वीकारण्यास नकार

अनीमध्ये काँग्रेसमधून बंडखोरी करत परस राम यांनी निवडणूक लढवली होती. येथून भाजपचे उमेदवार लोकेंद्र कुमार विजयी झाले. मात्र, विद्यमान आमदार किशोरी लाल यांनीही येथून बंडखोर म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, येथे लढत लोकेंद्र कुमार आणि परसराम यांच्यात होती. देहरामध्ये विद्यमान आमदार होशियार सिंह यांनी भाजपमधून बंडखोरी करून निवडणूक लढवली आणि येथून भाजप आमदार रमेश ढवला यांचा पराभव झाला. होशियार सिंग यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली.

Himachal Pradesh Assembly Election
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न मराठमोळ्या चंद्रकांत पाटलांनी पूर्ण केले!

नालागढचे माजी आमदार केएल ठाकूर यांनी भाजपविरोधात बंडखोरी करून निवडणूक लढवली. येथे केएल ठाकूर यांनी काँग्रेसचे उमेदवार हरदीप बावा यांना कडवी झुंज देत निवडणूक जिंकली. भाजपचे उमेदवार लखविंदर राणा येथे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. इंदोरा येथील माजी आमदार मनोहर धीमान यांनी भाजपविरोधात बंड केले, तर येथील काँग्रेसचे उमेदवार मलेंद्र राजन यांनी भाजपच्या विद्यमान आमदार रिता धीमान यांचा पराभव केला. किन्नौरचे भाजपचे माजी आमदार तेजवंत नेगी यांनी तिकीट नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली, तर येथेही काँग्रेसचे आमदार जगतसिंग नेगी यांनी भाजप उमेदवार सूरत नेगी यांचा पराभव केला.

Himachal Pradesh Assembly Election
हिमाचल जिंकणाऱ्या काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ मायलेकासह पाच नावे आघाडीवर!

फतेहपूरमध्ये माजी खासदार कृपाल परमार यांनी मंत्री राकेश पठानिया यांच्या विरोधात बंड केले आणि येथेही विद्यमान आमदार भवानी पठानिया पुन्हा विजयी झाल्या. कुल्लूचे माजी उमेदवार राम सिंह यांनी भाजपचे उमेदवार नरोत्तम सिंह यांच्याविरोधात बंडखोरी करत येथे अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. येथे माजी खासदार महेश्वर सिंह यांचे तिकीट कापण्यात आले. मात्र, महेश्वर सिंह यांना बसवण्यात आले, मात्र येथेही भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुंदरसिंह ठाकूर पुन्हा आमदार झाले. हमीरपूरमध्ये बंडखोर आशिष शर्मा यांनी भाजपचे उमेदवार आमदार नरेंद्र ठाकूर यांचा पराभव केला.

Himachal Pradesh Assembly Election
भाजप मुख्यमंत्र्यांचा राजीनामा : राजीनाम्यानंतर म्हणाले, ‘बोलावणे आले तर दिल्लीला....’

धर्मशालामधून विपिन नैहरिया, अनिल चौधरी, मनालीमधून महेंद्र ठाकूर, बारसरमधून संजीव शर्मा, भोरंजमधून पवन कुमार, रोहरूमधून राजेंद्र धिरता आणि चंबामधून इंदिरा कपूर यांनी भाजपविरोधात बंड केले आणि भाजपचे उमेदवार येथे पराभूत झाले. दुसरीकडे माजी आमदार जगजीवन पाल यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी करून अपक्ष म्हणून उभे राहिले, तर येथे भाजपला त्याचा फायदा झाला आणि विधानसभा अध्यक्ष विपीनसिंग परमार यांनी बाजी मारली.

Himachal Pradesh Assembly Election
शिवरायांच्या अवमानावर बोलणारे अमोल कोल्हेंचा माईक बंद केला : महाराष्ट्रात संतापाची भावना

नड्डांच्या गृहजिल्ह्यात भाजपचा चारपैकी तीन जागांवर विजय

नड्डा यांच्या गृहजिल्ह्यात भाजपला क्लीन स्वीप करता आलेला नाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या गृहजिल्ह्यात भाजपने चारपैकी तीन जागा जिंकल्या आहेत. घुमरविनमधून भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या राजेंद्र गर्ग यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी नड्डा आणि सीएम जयराम यांच्या संमतीनंतर मैदानात उतरलेले बिलासपूर सदरचे त्रिलोक जामवालही विजयी झाले. मात्र, जामवाल यांनी निकराच्या लढतीत जेपी नड्डा यांच्याच जागेवरून केवळ २७६ मतांनी विजय मिळविला.

श्री नयना देवीजी येथून भाजपने १७१ मतांनी विजय मिळवला, परंतु रणधीर शर्मा मोठ्या आकड्याला स्पर्श करू शकले नाहीत. भाजपने झंडुताची एकमेव जागा पाच हजारांहून अधिक मतांनी जिंकली आहे. निवडणुकीच्या घोषणेपूर्वी पंतप्रधान मोदी बिलासपूरमध्ये एम्सच्या उद्‌घाटनासाठी आले होते, तेव्हा ते म्हणाले होते की, राज्यातील जनता हुशार आहे आणि विकासाची निवड करेल. डबल इंजिनचे सरकार असेल तेव्हाच विकास होईल. बिलासपूरमध्ये झालेल्या विकासकामांचे थेट श्रेयही त्यांनी नड्डा यांना दिले. भाजपने संपूर्ण विधानसभा निवडणूक केवळ विकासकामांवरच लढवली.

आदित्यनाथ, नड्डांनी सभा घेतलेल्या मतदारसंघात भाजप काठावर पास

त्याचवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घुमरविनमध्ये गर्ग यांचा स्टार प्रचारक म्हणून प्रचार केला. जेपी नड्डा स्वत: निवडणूक प्रचारादरम्यान तब्बल 9 दिवस जिल्ह्यात थांबले होते. प्रत्येक जिल्ह्यात ठिकठिकाणी निवडणूक रॅली काढल्या. मात्र असे असतानाही नयना देवी जी सदरमध्ये अत्यंत कमी मताधिक्याने जिंकण्यात भाजप नेत्यांना समाधान मानावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com