Eknath Khadse Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Khadse News: एकनाथ खडसेंवरची मोठी नामुष्की टळली, हायकोर्टाकडून मोठा दिलासा

Eknath khadse Crime News: एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. 52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. पण या सर्व व्यवहारात राज्य सरकारचे सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आलं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : भोसरी येथील औद्योगिक भूखंड खरेदी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात राज्य सरकारनं खटला दाखल केला आहे. याप्रकरणी मुंबई न्यायालयानं खडसेंना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून एकनाथ खडसेंवर याप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे, खडसे कुटुंबियांविरोधातील 13 फेब्रुवारीला होत असलेली आरोप निश्चितीची कारवाईची टांगती तलवार आता नसणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाकडून आमदार एकनाथ खडसे यांना भोसरी भूखंड घोटाळाप्रकरणी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेला आता 24 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

यावेळी उच्च न्यायालयानं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात 2018 साली झालेल्या सुधारणेला मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर आव्हान देण्यात आल्याची नोंद घेतल्याचं निरीक्षण नोंदवत याप्रकरणी आरोप निश्चितीच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

मात्र, न्यायालयानं यावेळी 24 तारखेपर्यंत द्विसदस्यीय खंडपीठासमोर तातडीनं हे प्रकरण मेंशन करुन घेण्याच्या सूचनाही न्या.अश्विन भोबे यांनी दिले आहेत. यावेळी एकनाथ खडसेंच्यावतीनं न्यायालयात अॅड. करणसिंह राजपूत आणि अॅड. आशिष वर्णेकर यांनी हा युक्तिवाद केला.

भोसरी येथील औद्योगिक भूखंड खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या विरोधात राज्य सरकारने खटला दाखल केला आहे. त्याची सुनावणी मुंबई न्यायालयात सुरू आहे. या सुनावणीला गैरहजर राहिल्याने खडसे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढला होता.

याबाबत खडसेंच्या वकिलांनी प्रकृतीच्या कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही. विविध कारणांमुळे त्यांना गेल्या काही सुनावणींना हजर राहता आलेली नाही. त्याबाबत खडसे यांची भूमिका न्यायालयानं समजून घेतल्याचं दिसून आलं.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी येथील एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र. 52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. पण या सर्व व्यवहारात राज्य सरकारचे सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी समोर आलं आहे. म्हणून गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावून त्यांना अटक केली. खडसेंचीही याप्रकरणी चौकशी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT