Chandrapur Mayor: महापौरपदासाठी ठाकरे, वडेट्टीवार समर्थक, MIM अन् वंचितची भाजपला साथ : चंद्रपूरमध्ये 11 नगरसेवकांनी केला काँग्रेसचा गेम

Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूर महापालिकेत भाजपने शिवसेनेच्या (उबाठा) मदतीने अनपेक्षित सत्ता स्थापन केली आहे. भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या सोनाली महाडूळे यांचा एका मताने पराभव करत महापौरपद पटकावले, ज्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
BJP leader Sangita Khandekar celebrates after being elected Mayor in the Chandrapur Mayor Election 2026, marking a major political upset in the municipal corporation.
BJP leader Sangita Khandekar celebrates after being elected Mayor in the Chandrapur Mayor Election 2026, marking a major political upset in the municipal corporation.Sarkarnama
Published on
Updated on

Vijay Wadettiwar vs Pratibha Dhanorkar: चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार सोनाली महाडूळे यांचा एका मताने पराभव झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि अपक्षांच्या साथीने भाजपच्या उमेदवार संगीता खांडेकर यांचा विजय झाला. महाडूळे यांना 31 आणि खांडेकर यांना 32 मते मिळाली.

66 नगरसेवकांच्या चंद्रपूर महापालिकेमध्ये 27 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा ठरला होता. तर भाजप 23, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 6, जनविकास सेना 3, वंचित बहुजन आघाडी 2, अपक्ष 2, शिवसेना 1 आणि एमएआय 1 असे सभागृहातील संख्याबळ होते. बहुमताचा 34 हा आकडा गाठण्यासाठी भाजपला 10 तर काँग्रेसला केवळ 7 मतांची गरज होती.

यातील जनविकास सेनेचे 3 आणि 2 अपक्ष नगरसेवक काँग्रेससोबत होते. त्यामुळे काँग्रेसला आणखी 2 नगरसेवकांचा पाठिंबा आवश्यक होता. महाविकास आघाडीतीली नैसर्गिक मित्रपक्ष म्हणून काँग्रेसने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आघाडीचा प्रस्ताव दिला. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी थेट महापौरपदावरच दावा सांगितला.

BJP leader Sangita Khandekar celebrates after being elected Mayor in the Chandrapur Mayor Election 2026, marking a major political upset in the municipal corporation.
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपुरात काँग्रेसला मोठा धक्का! ठाकरेंच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर

जो आम्हाला महापौरपद देईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ असे गिऱ्हे यांनी स्पष्ट केले. याबाबत काँग्रेससोबत आज पहाटे 4 वाजपर्यंत काँग्रेस नेत्यांसोबत बैठक झाली. पण कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नाही. अखेर गिऱ्हे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार समर्थक 2 अपक्ष आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाने भाजपची साथ दिली.

वंचित अन् एमआयएमचीही भाजपला साथ

वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक महापौरपदाच्या निवडणुकीवेळी अनुपस्थित राहिले. शिवाय एमआयएमच्या एका नगरसेवकाने सभागृहात तटस्थ भूमिका घेतली. या तिन्ही नगरसेवकांची भूमिका भाजपला पुरक अशीच होती.

त्यामुळे बहुमताचा आकडा 32 पर्यंत आला. भाजपने स्वतःचे 23, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार समर्थक 2 अपक्ष आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाने महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. विजय वडेट्टीवार यांनी मात्र ते आपले समर्थक नगरसेवक असल्याचे नाकारले आहे.

BJP leader Sangita Khandekar celebrates after being elected Mayor in the Chandrapur Mayor Election 2026, marking a major political upset in the municipal corporation.
PMC Mayor: महापौरांच्या आयुष्याची चित्तरकथा! वडील अंधार कोठडीत, नातेवाईकांनी केली फसवणूक, वेदनेच्या वाटेवर उमलली यशाची फुलं

सव्वा-सव्वा वर्षांच्या दोन टर्म

भाजप नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महापौरपदासाठी सुरुवातीचे अडीच वर्षांमध्ये सव्वा सव्वा वर्षांच्या दोन टर्म करण्यात आल्या आहेत. यात भाजपला सव्वा वर्षे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सव्वा वर्षांसाठी महापौरपदाची टर्म मिळणार आहे. शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रशांत दानव यांना 5 वर्षांसाठी उपमहापौरपद देण्यात आले आहे.

दिल्लीपर्यंत गाजला धानोरकर - वडेट्टीवार वाद

काँग्रेसमधील महापौरपदाच्या निवडणुकीचा वाद दिल्लीपर्यंत गाजला. वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन्ही नेत्यांनी महापौरपदावर आपलाच उमेदवार असावा यासाठी क्लेम केला होता. धानोरकर गटाचे 13 आणि वडेट्टीवार गटाचे 17 नगरसेवकांनी स्वतंत्र गटनोंदणी केली होती. अखेर दिल्लीमध्ये अडीच-अडीच वर्षांसाठी महापौरपदाचा तोडगा निघाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com