Udayanraje Bhosle Application for Lok Sabha  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde News : 'आजचे शक्तिप्रदर्शन हा तर ट्रेलर, आता पिक्चर...'; CM शिंदेंनी दिली उदयनराजेंच्या विजयाची गॅरंटी!

Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमतान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी साताऱ्यात शक्तीप्रदर्शन करत महारॅली काढण्यात आली होती.

Umesh Bambare-Patil

Satara Lok Sabha News : साताऱ्यात उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरताना झालेली गर्दी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निश्चय सातारकरांनी केला आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले प्रचंड मतांनी विजयी होतील. आजचा हा ट्रेलर असून मतदानादिवशी पिक्चर बघा, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात व्यक्त केला.

सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या माध्यमतान भाजपचे खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosle यांनी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी साताऱ्यात शक्तीप्रदर्शन करत महारॅली काढण्यात आली होती. जलमंदीर पॅलेस या निवासस्थानापासून बैलगाडीतून उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, अतुल भोसले हे गांधी मैदानावर रॅलीतून आले. तेथून स्वतंत्र सजवलेल्या दोन रथांच्या माध्यमातून महारॅली मार्गस्थ झाली. एका रथावर उदयनराजे भोसलेंसह मान्यवर सहभागी झाले होते. तर दुसऱ्या रथात महायुतीतील घटक पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांसमवेत दमयंतीराजे भोसले याही सहभागी झाल्या होत्या.

महारॅली पोवई नाक्यावर असल्यानंतर हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, हे त्या ठिकाणी दाखल झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.

यावेळी उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis, अजित पवार, शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, महेश शिंदे, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, पुरुषोत्तम जाधव, अशोक गायकवाड उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra modi यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निश्चय सातारकरांनी केला आहे. त्यामुळेच इतकी प्रचंड गर्दी आज झाली असून उदयनराजे भोसले हे प्रचंड मतांनी निवडून येतील. सभा घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे चार आमदार असून दोन विधानसभा मतदारसंघात महायुतीची प्रचंड ताकतीची आहे. त्यामुळे उदयनराजे प्रचंड ताकतीने विजयी होतील. आजचे शक्ती प्रदर्शन हा ट्रेलर सर्वांनी बघितला आहे. आता पिक्चर मतदानादिवशी बघा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती उदयनमहाराज चांगल्या मतांनी निवडून येतील. भाजपच्या ४०० पारमध्ये उदयनराजे हे मोदींसोबत साताऱ्यातून असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT