Sanjay Raut News : नवनीत राणांवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली; म्हणाले...

Amravati Lok Sabha Constituency : 56 इंच छाती सांगणारे फक्त दुबळ्या पाकिस्तानवर आग पाखडत असतात. मात्र, चीनच्या कुरापतींवर अवाक्षरही बोलत नाहीत. त्यांना भीती असल्यानेच शिवसेना फोडली, शरद पवारांची भीती असल्यानेच राष्ट्रवादी फोडली, काँग्रेसची भीती असल्याने त्यांच्यावर खोटी कारवाई केली.
Sanjay Raut and Navneet Rana
Sanjay Raut and Navneet RanaSarkarnama

Amaravti Political News : लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक होणाऱ्या मतदारसंघातील उमेदवारांनी शक्तप्रदर्शन करत अर्ज भरले. त्यावेळी आपापल्या उमेदवारांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सभा झाल्या. यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यात अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडेंसाठी घेण्यात आलेल्या सभेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी, भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले.

संजय राऊत म्हणाले, 56 इंच छाती सांगणारे फक्त दुबळ्या पाकिस्तानवर आग पाखडत असतात. मात्र, चीनच्या कुरापतींवर अवाक्षरही बोलत नाहीत. त्यांना भीती असल्यानेच शिवसेना फोडली, शरद पवारांची भीती असल्यानेच राष्ट्रवादी फोडली, काँग्रेसची भीती असल्याने त्यांच्यावर खोटी कारवाई केली. ते 56 इंच छाती घेऊन मणिपूरला गेले नाहीत. लडाखला जात नाहीत. आमची लढाई गुजरातशी नसून मोदी-शाह यांच्याशी असल्याचेही राऊतांनी स्पष्ट केले.

अमरावतीची लढाई ही मोदीविरोधात असल्याचे सांगताना राऊतांनी नवनीत राणांबाबत वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, ही लढाई बळवंत वानखडे आणि ती नाची, डान्सर, बबलीशी नाही तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र, मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे, मोदी विरुद्ध शरद पवार, मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. राणांबाबत उच्चारलेल्या शब्दांमुळे महायुती राऊतांवर तुटून पडण्याची शक्यता.

Sanjay Raut and Navneet Rana
Latur Loksabha : लातूरच्या शृंगारेंची गाडी सुसाट; विद्यमान आमदारांना केले माजी, तर बावनकुळे यांचा उल्लेख बावनसुळे...

या वेळेला पंजा, तुतारी मशालपेक्षा देश आहे का हा आधी विचार केला पाहिजे. शिवसेनेने कधी पंजाला वगैरे मागितले नाही ठीक आहे. मात्र, इतकी वर्षे कमळाबाईला मत मागितले तिने काय दिवे लावले. इतकी वर्षे कमलाबाई-कमळाबाई केले ती झाली का आमची, अशी शब्दांत खासदार राऊतांनी भाजपचा समाचार घेतला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Sanjay Raut and Navneet Rana
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत आमदारांचे तिकीट धोक्यात, भाजपचा वेगळाच प्लॅन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com