Takli Gram Panchayat Activist Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

एकनाथ शिंदे गटाचा पहिला विजय : पंढरपूरच्या टाकळी ग्रामपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता

एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वच सर्व १४ जागांवर विजय मिळविला आहे, त्यामुळे शिंदे गटात नवचैतन्य पसरले आहे.

भारत नागणे

सोलापूर : राज्यातील सत्तांतरानंतर आता ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच झालेल्या ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणुकीत शिंदे गटाने पहिला विजय पंढरपुरातून (Pandharpur) मिळाला आहे. टाकळी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने आपला झेंडा रोवला आहे. शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायत अक्षरश हिसकावून घेतली आहे. (Eknath Shinde group power on Takli Gram Panchayat in Pandharpur)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश साठे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर शहरालगत असलेल्या टाकळी ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला मिळाली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वच सर्व १४ जागांवर विजय मिळविला आहे, त्यामुळे शिंदे गटात नवचैतन्य पसरले आहे.

निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आणि शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख महेश साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांच्या ताब्यातून ही ग्रामपंचायत हिसकावून घेतली आहे. निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक संजय देविदास साठे, रेश्मा संजय साठे, रोहिणी महेश साठे यांच्यासह १४ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीला आल्यानंतर टाकळी येथे राज्यातील पहिला कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना पांडुरंग पावला, अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT