पंढरपुरातील राष्ट्रवादीचा बडा नेता एकनाथ शिंदेंच्या गळाला; शहाजीबापूंनी लावली फिल्डिंग!

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात आल्यानंतर त्यांची अनेक नेत्यांनी भेट घेतली होती. त्यामध्ये नगराध्यक्ष साधना भोसले आणि त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांचा समावेश होता.
NCP-Eknath Shinde
NCP-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde)-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमुळे राज्यात अनेक ठिकाणी राजकीय उलथापालथी सुरू झाल्या आहेत. पंढरपुरातही (Pandharpur) राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी नगरपालिकेच्या तोंडावर पालिकेतील सत्ताधारी एक गट मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश करण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) ग्रामीण भागातील एक वजनदार नेत्यासह अनेक पदाधिकारीही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची खात्रीशीर माहिती आहे. राष्ट्रवादीच्या या नेत्यासाठी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji patil) यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. (Big leader of NCP in Pandharpur will join Eknath Shinde's group)

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्याचे लोण आता तालुका पातळीवर पोचले आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपुरातील राष्ट्रवादी व काँग्रेसचे काही बडे राजकीय नेते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. ऐन नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पंढरपुरात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

NCP-Eknath Shinde
‘राष्ट्रवादीची कार्यकारिणीही निवडू न शकलेल्या बळिराम साठेंनी दुसऱ्यांना ब्रह्मज्ञान शिकवू नये’

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात आल्यानंतर त्यांची अनेक नेत्यांनी भेट घेतली होती. त्यामध्ये नगरपालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष साधना भोसले आणि त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांचा समावेश होता. पंढरपुरातील शिंदे समर्थकांच्या घरी बंद खोलीत त्यांची सविस्तर चर्चा झाल्याचीही माहिती आहे. अलीकडेच नागेश भोसले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याचीही चर्चा आहे.

NCP-Eknath Shinde
सरन्यायाधीशांचे मोठं वक्तव्य : ‘उद्या कोणीही म्हणेल आम्ही दोन तृतीयांश असून पक्ष आहोत, हे लोकशाहीसाठी घातक’

पंढरपुरात माजी आमदार प्रशांत परिचारक विरोधात समविचार आघाडीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांचे प्रयत्न सुरु असतानाच दुसरीकडे विरोधी गटाचे अनेक नेते मुख्यमंत्री शिंदे गटात जाण्यास इच्छुक आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण भागातील एक वजनदार नेत्यानेही शिंदे गटात जाण्याची तयारी सुरु केली आहे. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते.

NCP-Eknath Shinde
'शिंदे-फडणवीसांना ८ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करता येणार नाही!'

भालके-काळे गटाच्या कार्यकर्त्यांची शिंदे गटाला पसंती

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भगिरथ भालके आणि कल्याणराव काळे गटाचा मोठा पराभव झाल्यानंतर भालके-काळे गटाचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. यातूनच अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजकीय पर्याय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पसंती दिल्याची माहिती आहे. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com