Sanjay Raut, Eknath Shinde, Gulabrao Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Eknath Shinde : शिंदे तेव्हा साधुसंत होते आणि आता गुंड झाले का? गुलाबराव पाटलांचा सवाल

Gulabrao Patil : एकनाथ शिंदेंच्या मदतीला धावलेल्या गुलाबराव पाटलांचा संजय राऊत यांना प्रत्युत्तर

Vishal Patil

Satara Political News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गुंड नीलेश घायवळसोबत फोटो आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचा गुंड हेमंत दाभेकरसोबत फोटो यामुळे एकनाथ शिंदे टीकेचे धनी ठरले आहेत. यावरून खासदार संजय राऊत यांनी केलेली टीका एवढी झोंबली आहे की, गुलाबराव पाटील यांनी राऊतांना प्रत्युत्तर देत वेगळा सवाल केला आहे.

'महाराष्ट्रात गुंडाराज. गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य' असं ट्वीट करून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गुंड नीलेश घायवळ यांचा एकत्रित फोटो शेअर केला आहे.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारावरून देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड उठली. त्यानंतर त्यांच्या मदतीला आशिष शेलार धावून आले. तसे एकनाथ शिंदेंची बाजू सावरण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) पुढे आले आहेत.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ठाकरेंसोबत होते तेव्हा साधुसंत होते आणि आता मुख्यमंत्री गुंड वाटत आहेत का, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला आहे. दीड -दोन वर्षांपासून ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटातील आमदारांना गा़डण्याची भाषा बोलली जात असल्याचे आम्ही ऐकत आलो आहोत, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फोटो काढताना माहिती नसतं

नेत्याबरोबर कोण आहे, हे तपासले जात नाही. आता माझ्यासोबत कोण आहे, तो कोणत्या वृत्तीचा आहे, हे मला माहिती नाही. एकनाथ शिंदे ठाकरे गटासोबत असताना साधुसंत होते आणि आता त्यांना गुंड वाटायला लागले आहेत, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

भुजबळांचा वेगळा निर्णय नाही

ओबीसी (OBC) समाजाकडून वेगळा पक्ष काढण्याची घोषणा प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. तत्पूर्वी त्यांनी छगन भुजबळ यांच्याशी सल्लामसलत केल्याची चर्चा आहे. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारले असता, 'छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मंडल आयोगापासून ओबीसीचे काम करत आहेत. त्यांचा मार्ग हा ओबीसीचा आहे. त्यांना जे वाटतं ते बोलतात. छगन भुजबळ वेगळा पक्ष काढण्याचा चुकीचा निर्णय घेणार नाहीत. त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. तेव्हा भावना म्हणजे कृती नाही. हे कृतीत आल्यानंतर त्यावर बोलण्यात अर्थ आहे,' असे गुलाबराव पाटील म्हणाले.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT