Gangster In Mantralaya : गुंडाचे मुख्यमंत्र्यांसोबत फोटोशूट; विरोधक म्हणतात, ‘हीच का ती मोदी गॅरंटी’

Eknath Shinde News : मंत्रालयात एक गुंड येतो आणि रील शूट करतो. मात्र, तिथेच सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयात प्रवेशासाठी कधी कधी तासनतास रांगेत उभं राहावं लागतं.
Nilesh Ghaywal
Nilesh GhaywalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : गुंडांना भेटल्याच्या कारणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यावर विरोधकांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. मुख्यमंत्री हे गुंड प्रवृतीला प्रोत्साहन देत आहेत आणि त्यांना समर्थन करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर केला जात आहे. मंत्रालयात एक गुंड येतो आणि रील शूट करतो. मात्र, तिथेच इतर सर्वसामान्यांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतो. तासनतास रांगेत उभं राहावं लागतं. त्यामुळे राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. (Notorious gangster's photo shoot with Chief Minister Eknath Shinde)

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा एक फोटो ट्विट केला आहे. त्यात जमिनीवर बाहेर असलेला गुंड नीलेश घायवळ याने मुख्यमंत्र्यांंची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांच्यासोबत फोटो काढला आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी त्या गुंडाचा एक व्हीडिओ ट्विट केला आहे, ज्यात त्याने रील शूट केला आहे. यावरून आता विरोधी नेत्यांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Ghaywal
Malegaon Tender Scam : एमआयएम आमदाराचे टेंडरसंदर्भात ‘ते’ वाक्य अन्‌ विरोधकांसह मित्रपक्षही तुटून पडले

कोण आहे नीलेश घायवळ?

नीलेश घायवळ याच्या विरोधात पुण्यातील विविध पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. घायवळच्या संपूर्ण टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजली होती. येरवडा कारागृहातूनच पुणे पोलिसांनी नीलेश घायवळवर अटकेची कारवाई केली होती. आता त्याच गुंडाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो व्हायरल झाला आहे.

सर्वसामान्य जनतेला त्रास

राज्यातून अनेक नागरिक त्यांच्या कामासाठी मंत्रालयात येत असतात. सर्वसामान्य नागरिकांना मंत्रालयात प्रवेशासाठी कधी कधी तासनतास रांगेत उभं राहावं लागतं. गरजेची कागदपत्रे सोबत नसली की त्यांना प्रवेशही नाकरण्यात येतो. कागदपत्रांची कसून तपासणी केली जाते. कुठल्या मंत्र्याकडे जायचे असून नेमकं त्या कागदपत्रात मजकूर काय आहे, हेही तपासले जाते. यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे.

Nilesh Ghaywal
Khed Politics : ठाकरे गटाने तेल ओतले; मोहितेंना डावलून चालणार नाही, खांडेभराडांचा पोखरकरांना टोला

गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहेत. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटीविरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन, उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहे.नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती ‘मोदी की गॅरंटी’?, असं ट्विट करत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

Nilesh Ghaywal
Neelam Gorhe News: नीलम गोऱ्हे यांचा 'तो' संकल्प पूर्ण होईल का?

श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाला गुंडाची हजेरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील एका गुंडाने वर्षा या शासकीय निवासस्थानी उपस्थिती लावली होती. तो गुंड श्रीकांत शिंदेंना शुभेच्छा देताना फोटोत दिसत आहे. खासदार राऊत यांनीसुद्धा हा फोटो ट्विट केला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यातील हा गुंड कोण? याची विचारणा राज्य सरकारकडून पुणे पोलिसांना करण्यात आली. हा व्यक्ती पुण्यातील कुख्यात गुंड हेमंत दाभेकर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याला श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत आणणाऱ्या शिवसेनेच्या युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक अनिकेत जावळकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

Nilesh Ghaywal
Nitin Thackeray News : उमेदवारी जाहीर होण्याआधीच नितीन ठाकरेंना मिळाल्या लाखोंच्या देणग्या..!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com