Eknath Shinde, Rajesh Kshirsagar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shiv Sena news : मंत्रिपद दिलं नाही म्हणून वाईट वाटलं, आता तरी द्या! एकनाथ शिंदेंच्या आमदारानं जाहीरपणे बोलून दाखविली खदखद

Prakash Abitkar, Rajesh Kshirsagar latest news, ministerial berth demand : कोल्हापुरात शिवसेनेतील अंतर्गत नाराजी पुन्हा उफाळली; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना अप्रत्यक्ष टोला देत आमदार क्षीरसागर यांची ‘आता तरी मला मंत्रिपदाची संधी द्या’ अशी मागणी.

Rahul Gadkar

Maharashtra politics : कोल्हापुरातील शिवसेनेमध्ये मंत्रिपदावरून अंतर्गत खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. पालकमंत्रिपद प्रकाश आबिटकर यांना मिळाल्याने शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र अडीच वर्षानंतर पुन्हा मंत्रिपद मिळेल, अशी आशा आमदार क्षीरसागर यांना आहे. आता हे मंत्रिपद आपल्याला मिळावे, अशी मागणी करत क्षीरसागर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करून दाखवली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्ष वाढीसाठी प्रचंड मेहनत घेतात. यापूर्वीही घेत होते.पण आता ज्यांची मंत्रिपदासाठी निवड झाली आहे, त्यांनी इतर जिल्ह्यांमध्ये देखील पक्ष वाढीसाठी काम केलं पाहिजे.शिवसेनेत अनेक बाहेरची लोक येऊन मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांना पक्ष वाढीचे महत्व कदाचित कळालेलं नाही. शिवसेनेतील मंत्र्यांनी पक्ष वाढीसाठी काय केलं? याच रिपोर्ट कार्ड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावे, अशी थेट मागणीच क्षीरसागर यांनी केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात देखील म्हणावा तसा पक्ष वाढत नाही. मी ४० वर्षे जुना कार्यकर्ता असून मला मंत्रिपद दिलं नाही, याचं मला वाईट वाटलं. संपूर्ण संघटना घेऊन मी साहेबांसोबत गेलो तरी देखील मला मंत्रिपद मिळालं नाही, अशी खंत आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं माझ्यावर प्रेम आहे. पण त्यांच्यासमोर देखील काही अडचणी असतील, असे सांगत क्षीरसागर यांनी सावरून घेण्याचा प्रयत्न केला.

आबिटकर यांना मंत्रिपद दिल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे हवे, याची मागणी मी केली होती. त्यावेळी साहेबांनी देखील सांगितलं होतं की, अडीच वर्षानंतर रिपोर्ट कार्ड बघून मंत्रिपद बदलले जाईल. ते आता नेत्यांनी देखील पाळले पाहिजे. मला आता मंत्रिपदाची संधी दिली पाहिजे, असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

पक्षवाढ न होण्याला प्रकाश आबिटकर जबाबदार आहेत का? यावर बोलताना क्षीरसागर म्हणाले, मी दुसऱ्या कोणावरही टीका करणार नाही. पण माझ्या ऑफिस समोर नेहमी गर्दी असते, तशी दुसऱ्यांच्या ऑफिस मध्ये गर्दी नसते. तुमच्या दारात जेवढ्या चपला तेवढी तुमची श्रीमंती. प्रत्येकाला कमी वेळेत न्याय द्यावा ही माझी काम करण्याची पद्धत आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त करत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

दरम्यान, कोल्हापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेकडे चांगले संख्याबळ आहे. शिक्षक मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे मंगेश चिवटे इच्छुक आहेत. पदवीधरमधून भाजपकडून शरद लाड इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीचा निर्णय हे वरिष्ठ घेतील. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सतेज पाटील निवडून येतील, हा दूर दूर चा विषय बनलेला आहे. कारण महायुतीकडे आता संख्याबळ अधिक आहे, असे विधान आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT