शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची घोषणा ‘माझं कुंकू, माझा देश’ अभियान राबवणार
या अभियानावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांची टीका
या मोहिमेवरून राजकीय संघर्ष पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता
Pune News : आज होणाऱ्या भारत पाकिस्तान मॅचवरून जोरदार वाद रंगला असून विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. यावरून राज्यात देखील वाद होताना दिसत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजप आणि शिवसेनेवर टीका केली आहे. खासदार संजय राऊत यांनी यावरून टीका करताना 'माझं कुंकू, माझा देश' अभियान राबवणार असल्याची माहिती दिली होती. यावर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. मंत्री उदय सामंत यांनी, हाच मुद्दा धरत, आपल्याला शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांच्या अकलेची किव करावीशी वाटते असा टोला लगावला आहे.
त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांचे काही नेते हे ऑपरेशन सिंदूर आपल्या राजकारणासाठी वापरत आहेत हे राज्याने पाहिलं आहे. ते सिंदूरच्या संदर्भामध्ये शंका उपस्थित करत आहेत. त्यांचे असं करण म्हणजे भारताच्या सीमेवर असणाऱ्या सैनिकांबद्दलच शंका उपस्थित करणार आहे. ज्या सैनिकांच्या जीवावर ते आज सुरक्षीत आहेत. देशाबाहेर फिरत आहेत. त्याच सैनिकांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल आज ते बोलत आहेत. याचा संबंध क्रिकेट सामन्याशी जोडून सिंदूर या ऑपरेशनची चेष्टा करत आहेत.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे दुबईमध्ये सामना होतोय तो इंटरनॅशनल क्रिकेटचा सामना आहे. त्याच्यापूर्वी वानखडे स्टेडियमवरील खेळपट्टी उकडल्यानंतर देखील अशा पद्धतीचे अनेक सामने बंद होते. हाच सामना जर आयपीएलचा असता तर तो ही बंद केला असता, असे सामंत यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तान बद्दल केंद्र सरकारची भूमिका जी सिंदूरच्या वेळी होती तीच भूमिका आजही आहे. दहशतवाद मोडला गेला पाहिजे, दहशतवाद परत पसरवू नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. सिंदूर ऑपरेशन हे स्थगित केलं आहे. ते संपलेलं नाही. त्यामुळे सिंदूरच्या नावानं सैनिकांचा अपमान करणं हा बालिशपणा आहे हा देशद्रोह आहे आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलेल आहे त्याचे परिणाम त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भोगायला लागतील असाही इशारा त्यांनी दिला आहे.
दरम्यान सामंत यांनी माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं आहे. शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी, ठाकरे यांनी एका माणसासाठी पक्ष पणाला लावला, पण अजुनही वेळ गेलेली नाही, असा टोला लगावत दोन आमदार सोडले तर इतर सर्व आमदार शिवसेनेत दसऱ्यानंतर येतील असा दावा केला होता. त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पक्षाची चिंता तुमाने यांनी करू नये, असा सल्ला दिला होता. त्यावरून सामंत यांनी, आमच्याकडे सगळं सुरळीत असून तिकडचे इकडे येऊ शकतात. आमच्याकडे कोणी जाणार नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.
प्र.1: ‘माझं कुंकू, माझा देश’ मोहीम कोणी जाहीर केली?
उ.1: ही मोहीम उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं जाहीर केली
प्र.2: यावर उदय सामंतांनी काय प्रतिक्रिया दिली?
उ.2: उदय सामंत यांनी उद्धव सेनेवर टीका करत ‘त्यांच्या अकलेची किव करावीशी वाटते’ अशी टीका केली आहे
प्र.3: शिवसेनेच्या या मोहिमेचा उद्देश काय आहे?
उ.3: राष्ट्रभक्तीचा संदेश देणे या उद्देश असून होणाऱ्या भारत पाकिस्तान मॅचला विरोध करणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.